Budget 2024 News | PM Awas Yojna Plans to Build 2 Crore Homes in 5 Next Years Saam Tv
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 News: अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा, नागरिकांचं परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार

PM Awas Yojna News: लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आमचे सरकारही राज्यांना विकासासाठी मदत करेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

प्रविण वाकचौरे

Budget 2024:

देशाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडला. यावेळी निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा केली आहे. नागरिकांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम मोदी सरकार सुरुच ठेवणार आहे. येत्या पाच वर्षात आणखी २ कोटी घरे निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आलं आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याबाबत म्हटलं की, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. सरकारचे लक्ष्य पारदर्शक कारभारावर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील. सोबतच 300 युनिट मोफत वीज देण्याचे उद्दिष्ट आहे. (latest budget update)

सर्वांगीण विकासावर आमचा भर आहे. आपली अर्थव्यवस्था खूप चांगली आहे. लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. आमचे सरकारही राज्यांना विकासासाठी मदत करेल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य

अर्थमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, आमच्या सरकारने प्रत्येक घरात पाणी, वीज, गॅस, आर्थिक सेवा आणि बँक खाती उघडण्याचे काम केले आहे. अन्नधान्याची चिंता दूर करण्यात आली आहे. 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देण्यात आले आहे. मू

मूलभूत गरजा पूर्ण झाल्याने त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न वाढले आहे. 2047 पर्यंत भारत एक विकसित राष्ट्र बनेल, आम्ही लोकांना सक्षम करण्यासाठी काम करत आहोत, असंही अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरातील वारणा धरणातून विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

कोणत्या देशात iPhone चा वापर सगळ्यात जास्त केला जातो? उत्तर वाचून बसेल धक्का

Maharashtra Politics : एकाची मराठीसाठी तळमळ, दुसऱ्याची खुर्चीसाठी मळमळ; एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंसाठी सॉफ्ट कॉर्नर

Eknath Shinde: दाढीवरून अर्धाच हात फिरवला, पूर्ण फिरवला असता तर...; ठाकरेंच्या पुष्पा स्टाइल टीकेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार

Chocolate Brownie Recipe: स्नॅक्स टाइमसाठी झटपट बनवा माउथ वाटरिंग चॉकलेट ब्राउनी, नोट करा ही सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT