PTI
Union Budget 2025 Highlights

Budget 2024 Date,Time: अर्थमंत्री सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषण कधी सुरू होईल? कुठे पाहू शकाल?

Budget 2024 Date And Time: अर्थमंत्री निर्मला सीतारामन नवीन एनडीए सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प कधी सादर करणार आहेत. संसदेतील त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण कधी सुरू होईल आणि ते कुठे पाहता येईल, ते जाणून घ्या.

Bharat Jadhav

अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या मंगळवारी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2024-25 या आर्थिक वर्षाचा (एप्रिल, 2024 ते मार्च, 2025) पूर्ण अर्थसंकल्प असून अर्थमंत्री सीतारामन ह्या सलग सातवा अर्थसंकल्प सादर करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळात म्हणजेच 2019 मध्ये सीतारामन यांना भारताच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री बनवण्यात आलं. त्यानंतर आतापर्यंत त्यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केलेत. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये त्यांनी सहावा अंतरिम अर्थसंकल्प मांडला होता.

उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा महिला अर्थमंत्री सीतारामन यांचा सलग सातवा अर्थसंकल्प असणार आहे. यावर्षी केंद्रात स्थापन झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प असणार आहे. पीएम मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण भाजपच्या नेतृत्वाखालील मोदी सरकारला केंद्रात बहुमत नाहीये.

यामुळे या अर्थसंकल्पमध्ये सरकार नागरिकांना काय सवलती देणार, कोणत्या योजनांच्या घोषणा केल्या जातील. कोणत्या सुविधा आणि प्रकल्प देशात येतील याकडे सर्वाचं लक्ष लागलंय. या सर्वसामान्य लोकांना योजना देणाऱ्या हा अर्थसंकल्प अर्थमंत्री कधी मांडतील. त्या त्यांचे अर्थसंकल्पीय भाषण कधी सुरू करतील, हे भाषण कुठे पाहाता येईल हे जाणून घेऊ .

अर्थसंकल्पीय भाषण किती वाजता सुरू होईल?

अर्थमंत्री सीतारामन उद्या 2024-25 या आर्थिक वर्षासाठी देशाचा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत मांडतील. मंगळवारी सकाळी 11 वाजता त्या आपले अर्थसंकल्पीय भाषण सुरू करतील अशी अपेक्षा आहे. सर्वसाधारण अर्थसंकल्पात रस्ते आणि भारतीय रेल्वेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय सामान्य वर्ग, पगारदार करदाते आणि मध्यमवर्गासाठी सरकार या सवलती देणार कडे सर्वांचे लक्ष लागलंय.

कुठे पाहाल अर्थमंत्र्यांचं भाषण

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अर्थसंकल्पीय भाषण साम टीव्हीच्या वेबासाईटवर लाइव्ह पाहू शकतात. तसेच साम टीव्हीच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकतात. याचबरोबर अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान केलेल्या प्रमुख घोषणांशी संबंधित बातम्या साम डिजिटल वेबसाइटवर पाहू शकतात. संसद टीव्हीवरही अर्थसंकल्पीय भाषण पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT