Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE Updates Saam TV
ब्लॉग

2023 Rajasthan Assembly Election Results LIVE: खूप मेहनत करूनही आम्हाला यश मिळाले नाही - अशोक गेहलोत

Ruchika Jadhav

चूरू जिल्यात काँग्रेसचा ४ जागांवर विजय; तर BSP आणि BJP चा एका जागेवर विजय

चुरूमधून भाजपचे हरलाल सहारन विजयी झाले आहेत.

तर सादुलपूरमधून बसपचे मनोज न्यागली यांचा विजयी झालाय.

सुजानगडमधून भाजपचे मनोजकुमार मेघवाल विजयी झाले आहेत

तारानगरमध्ये काँग्रेसचे नरेंद्र बुधनिया यांनी विजयाला गवसणी घातलीये.

सरदारशहरमधून काँग्रेसचे अनिल शर्मा विजयी झालेत.

रतनगडमध्ये काँग्रेसचे पुसाराम गोदरा यांनी विजयी मिळवलाय.

खूप मेहनत करूनही आम्हाला यश मिळाले नाही -  अशोक गेहलोत

राजस्थानच्या जनतेने दिलेला जनादेश आम्हाला मान्य आहे. आम्ही त्याचा स्वीकार केलाय. आमच्यासाठी हा अनपेक्षित निकाल होता. आमच्या योजना, कायदे आणि नवकल्पना लोकांपर्यंत नेण्यात आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले. मात्र आम्ही यशस्वी झालो नाही.

आलेल्या नवीन सरकारला माझ्या शुभेच्छा. माझा त्यांना सल्ला आहे की, खूप मेहनत करूनही आम्हाला यश मिळाले नाही, याचा अर्थ त्यांनी सरकारमध्ये आल्यानंतर त्यांना आमच्यापेक्षाही जास्त काम करावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी दिली आहे.

जयपूरमध्ये मंगळवारी सर्व आमदारांची होणार बैठक

गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानसह मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील निवडणुकांवर देशाचं लक्ष लागून आहे. राजस्थानमध्ये काँग्रेस पक्षाचा पराभव होताना दिसतोय. अशा परिस्थितीत राजस्थान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतासरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस विधीमंडळ पक्षाची सोमवारी आजोजित केलेली बैठक मंगळवारी होणार आहे. मंगळवारी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. 

Rajasthan Election 2023 Result: सायंकाळी ५.३० पर्यंत अशोक गेहलोत राजिनामा देण्याची शक्यता

राजस्थानमध्ये आलेले एक्सिट पोल पूर्णता फेल ठरल्याचं दिसत आहे. अशात अशोक गहलोत आज सायंकाळी ५.३० वाजता आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. १९९ जागांपैकी सध्या भाजप ११६ जागांवर आघाडीवर आहे. तक काँग्रेसने अजून ७० चा आकड देखील गाठलेला नाही.

Rajasthan Voting result: राजस्थानध्ये वसुंधरा राजे यांचा भरघोस मतांनी विजय

माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजस्थान विधानसभा २०२३ निवडणुकीत बाजी मारली आहे. झालरापाटनमधून त्यांना १०३०१० मतांनी विजय मिळाला आहे.

Rajasthan Assembly Election Results LIVE: राजस्थानध्ये परंपरा कायम! झटपट वाचा कोण जिंकलं कोण हारलं

राजस्थानमध्ये कुणाचं सरकार येणार याचं उत्तर आता जवळजवळ समोर आलं आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांनुसार, १०० ते १०८ जागा भाजपला मिळतील अशी शक्यता आहे. तर काँग्रेसला ७० ते ८० जागा मिळण्याची शक्यता आहे.

राजस्थानध्ये भाजपला अच्छे दिन; अनीता भदेल यांचा विजय

राजस्थानमध्ये निकालांचे कल समोर येत आहेत. अशात समोर आलेल्या माहितीनुसार, अजमेरमध्ये भाजपाने आपलं पहिलं खातं खोललंय. दक्षिण विधानसभामधून भाजपच्या अनीता भदेल यांनी विजय मिळवलाय. याबाबतची घोषणा बाकी आहे.

2023 Rajasthan Assembly Election Results LIVE: राजस्थानमध्ये भाजप 115 जागांवर आघाडीवर

राजस्थानमध्ये येत असलेल्या कलांनुसार, भाजप आघाडीवर असून विजयाच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. एकूण १९९ जागांपैकी ११५ जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर काँग्रेस पिछाडीवर दिसत आहे. काँग्रेस ७२ जागांवर आघाडीवर आहे.

Rajasthan Voting result: राजस्थानमध्ये भाजप ११२ जागांवर आघाडीवर; जयपुरमधील कार्यालयाबाहेर जल्लोष सुरू

मतमोजणी सुरू असताना समोर येत असलेले कल पाहून राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर दिसत आहे. सध्या भाजप ११२ जागांवर पुढे आहेत. आघाडीपाहून जयपूरमधील कार्यकर्त्यांनी पार्टी कार्यालयाबाहेर जल्लोष साजरा केला आहे.

Rajasthan Voters: राजस्थानमध्ये वसुंधरा राजे २३ हजार मतांनी आघाडीवर

झालरापाटनमधून वसुंधरा राजेंनी मुसंडी मारलीये. ते ३०३९५ मतांनी आघाडीवर आहेत. तर अशोक गेहलोत यांना २७२७९ मतांनी आघाडीवर आहेत.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: राजस्थानमध्ये भाजप आघाडीवर;  मुख्यमंत्री पदासाठी नावांची चर्चा 

राजस्थानमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्यांची टक्कर सुरु आहे. प्राप्त कलांनुसार, राजस्थानात भाजप विजयाच्या वाटेवर आहे. भाजपने मोठी आघाडी घेतल्यामुळे मुख्यमंत्री पद कोणाला? मिळणार या चर्चांना उधाण आलं आहे.

Ashok Gehlot: काँग्रेसचे मंत्री शांती धारीवाल ४ हजार मतांनी पिछाडीवर

कोटा उत्तर विधानसभा मतदारसंघातील तीन फेऱ्यांमध्ये आलेल्या कलांनुसार, UDH मंत्री शांती धारीवाल ४४२० मतांनी पिछाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार प्रल्हाद गुंजाळ यांनी आघाडी मिळवली आहे.

सचिन पायलट ३६०० मतांनी आघाडीवर

भाजप आणि काँग्रेसमध्ये काट्यांची टक्कर दिसत आहे. समोर आलेल्या कलांनुसार सचिन पायलट पुन्हा एकदा आघाडीवर आले आहेत. सचिन पायलट ३६०० मतांनी आघाडीवर आहेत.

Rajasthan Vidhan Sabha Result LIVE: भाजपने गाठला बहुमताचा आकडा; भाजप १०१, काँग्रेस ८३

भाजपने राजस्थानध्ये बहुमताचा आकडा गाठला आहे. सध्या आलेल्या कलांनुसार भाजप १०१ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ८३ जागांवर आघाडीवर आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE: भाजप बहुमताच्या आकड्यापासून एकपाऊल दूर; काँग्रेस बॅकफूटवर

Rajasthan Election result day: हरिमोहन शर्मा १८ मतांनी आघाडीवर 

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये, हरिमोहन शर्मा बुंदी विधानसभा मतदारसंघातून हरिमोहन शर्मा यांनी आघाडी घेतलीये. ते १८ मतांनी पुढे आहेत.

काँग्रेसचे सीएल प्रेमी १००० मतांनी आघाडीवर दिसतायत. तर हिंदोलीतून अशोक चंदना ५८४१ मतांनी आघाडीवर आहेत.

Rajasthan Polls 2023: राजस्थानमध्ये भाजपची १०० जागांवर आघाडी

राजस्थानमध्ये भाजप १०० जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ८४ जागांवर पिछाडीवर

आघाडीमBJP Vs Congress: झालरापाटनमध्ये भाजपची  ५००० मतांनी आघाडी

राजस्थानच्या झालरापाटन मतदारसंघातून भाजपची आघाडी दिसतेय. भाजप नेते वसुंधरा राजे ५००० मतांनी आघाडीवर आहेत. 

Political Equations of Rajasthan: राजस्थानमध्ये अटीतटीची लढत; भाजप ९६ जागांवर आघाडीवर

राजस्थामध्ये काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांत काट्याची टक्कर पाहायला मिळतेय. भाजप सध्या ९६ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस ९३ जागांवर आघाडीवर आहे.

राजस्थानमध्ये काँग्रेसची आघाडी

राजस्थान विधानसभा निवडणूकीचे निकाल येण्यास सुरूवात झाली आहे. सुरूवातीला भाजप आघआडीवर दिसले आता काँग्रेस आघाडीवर दिसत आहे. १४२ जागांपैकी भाजप ७६ जागांवर पुढे आहे. तक काँग्रेस ६१ जागांवर पुढे आहे.

Elections 2023: सुरूवातीच्या कलांनुसार भाजप आघाडीवर

जोधपुर पोस्टल बॅलेट

जोधपुर शहरात भाजप आघाडीवर

जोधपुर सरदारपुरा काँग्रेस आघाडीवर

लुणी भाजप आघाडीवर

बिलाड़ामध्ये भाजप आघाडीवर

भोपालगढ़मध्ये कांग्रेस आघाडीवर

Assembly Elections News :राजस्थानच्या ९९ जागांचे सुरूवातीचे कल; भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई

सध्या राजस्थानमध्ये भाजपने ५० जागांवर आघाडी घेतली आहे. तर काँग्रेस ४४ जागांवर पुढे दिसत आहे.

Rajasthan Assembly Election live update: भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हनुमान बेनिवाल यांच्याशी साधला संपर्क

मतमोजनीला सुरूवात होण्याआधी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्षाचे प्रमुख हनुमान बेनिवाल यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आरएलपीच्या उमेदवारांनी ३ विधानसभा जागांवर विजय मिळवला होता. याआधी हनुमान बेनिवाल एनडीएत होते. साल २०२० मध्ये शेतकरी विधेयकावरून ते युतीतून बाहेर पडले.

jodhpur constituency election result  : मतमोजणी थोड्याच वेळात सुरु होणार, जोधपूरमधील मतमोजणी केंद्रावर कडक पोलिस बंदोबस्त

Rajasthan Election News : राजस्थानात निकालाआधी वसुंधरा राजे गटाच्या बैठकांचा सिलसिला सुरु. रात्री ३ वाजेपर्यंत बैठका पार पडल्या.

राजस्थानात निकालाआधी वसुंधरा राजे गटाच्या बैठकांचा सिलसिला सुरु. रात्री ३ वाजेपर्यंत बैठका पार पडल्या.  (Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE)

राजस्थान विधानसभेत कुणाला मिळणार बहुमत? वाचा एक्झिट पोलचा अंदाज

राजस्थान विधानसभा २०२३ निवडणुकीत काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये भाजपला १०० ते ११० जागा मिळतील. तर ९० ते १०० जागा मिळण्याचा अंदाज आहे. याशिवाय ५ ते १० जागांवर अपक्ष उमेदवारांचा विजय होईल, असं एक्झिट पोलचे आकडे सांगत आहेत.

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्द भाजपचे महेंद्रसिंह राठोड, उपमुख्यमंत्री सचिन पायलट विरुद्द भाजपचे अजित सिंह, भाजप नेत्या वसुंधरा राजे विरुद्ध कॉंग्रसचे रामलाल चौहान या प्रमुख लढती आहेत.

काँग्रेस सत्ता राखणार की भाजप गुलाल उधळणार? राजस्थानमध्ये कुणाचं सरकार येणार?

राजस्थानमध्ये काँग्रेस आपली सत्ता कायम राखणार की भाजप गुलाल उधळणार? याचा फैसला आज होणार आहे. कारण, राजस्थान विधानसभा २०२३ निवडणुकीचा निकाल आज म्हणजेच रविवारी जाहीर होणार आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार असून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राजस्थानमध्ये २०० विधानसभा जागांसाठी एकूण १,८६२ उमेदवार रिंगणात आहेत. यासाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान घेण्यात आलं होतं. यावेळी ७५.४५ टक्के मतदान झालं. या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून त्याचा फैसला आजच होणार आहे.

२०१८ साली राजस्थान विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. तर भाजपचा दारुण पराभव झाला होता. यानंतर काँग्रेसचे अशोक गेहलोत हे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजस्थानमध्ये निवडणुकीची एक वेगळीच परंपरा आहे.

येथे १९९३ पासून कोणत्याही पक्षाला सलग दोन वेळा राज्यात सरकार स्थापन करता आलेलं नाही. राज्यात आळीपाळीने कधी भाजप तर कधी काँग्रेसचं सरकार आलं आहे. त्यामुळे काँग्रेस ही परंपरा मोडून सत्ता स्थापन करणार की भाजप विजयाची चव चाखणार? याचा फैसला आजच होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT