कॉलेज सुरु वसतिगृहे का बंद? वसतिगृहे सुरु करण्यासाठी विद्यार्थी आक्रमक SaamTvNews
ब्लॉग

कॉलेज सुरु वसतिगृहे का बंद? वसतिगृहे सुरु करण्यासाठी विद्यार्थी आक्रमक

महाविद्यालये सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी पुणे शहरात परतत आहे. मात्र, आता या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Krushnarav Sathe

पुणे : राज्यातील बहुतांशी महाविद्यालये सुरु झाली असून पुणे शहरात देखील अनेक महाविद्यालये सुरु झाली आहेत. महाविद्यालये सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या विविध भागातून विद्यार्थी पुणे शहरात परतत आहे. मात्र, आता या विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरात सामाजिक न्याय विभागाची वसतिगृहे व पुणे महानगरपालिकेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह आहे. मात्र, अद्यापही वसतिगृहे सुरु झाली नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या निवासाची प्रचंड गैरसोय होत आहे. त्यामुळे हि वसतिगृहे तात्काळ सुरु करण्यात यावी या मागणीसाठी छात्रभारती व स्टुडंट हेल्पिंग हँडस् या संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

हे देखील पहा :

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून समाजकल्याण विभागाची वसतिगृहे बंद आहेत. लॉकडाऊनच्या काळात या वसतिगृहांमध्ये कोरोना रुग्णांसाठी विलगीकरणाची सोय करण्यात आली होती. याच काळात या वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या साहित्याचे, वसतिगृहाच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अद्यापही या साहित्यांची दुरुस्ती झाली नसल्यामुळे व समाजकल्याण विभागाच्या दिरंगाई कारभारामुळे वसतिगृह सुरु होत नसल्याचा आरोप स्टुडंट हेल्पिंग हँडस् च्या कुलदीप आंबेकर यांनी केला आहे.

वसतिगृहे बंद आहेत, समाजकल्याण विभागाकडून विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अद्यापही मिळाल्या नाहीत. स्वाधार योजनेचा लाभ अद्यापही विद्यार्थ्यांना मिळालेला नाही. स्वाधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तात्काळ देय रक्कम त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, लॉकडाऊन पूर्वकाळात समाजकल्याण वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे काही महिन्यांचे प्रलंबित असणारे भत्ते तात्काळ त्यांना देण्यात यावेत आदी मागण्या घेऊन विद्यार्थ्यांच्या व दोन्ही संघटनांच्या संयुक्त शिष्टमंडळाने समाज कल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांची भेट घेऊन वरील मागण्यासंदर्भात चर्चा केली. येत्या सोमवार पर्यंत वसतिगृह सुरु करण्यासंदर्भात निर्णय न झाल्यास पुहा आंदोलन करण्यात येईल असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Hacks : फ्रिजमध्ये कुठेही काहीही ठेवता? जाणून घ्या कोणत्या रॅकमध्ये काय ठेवावं, नाहीतर होईल नुकसान

Google search safety: गुगलवर कधीही सर्च करू नका 'या' 7 गोष्टी; पडू शकतं महागात

Bigg Boss 20 House: 'बिग बॉस २०'च्या घरात भन्नाट ट्विस्ट; Room 20 आणि 2X मध्ये दडलंय मोठं सीक्रेट

२५ तासांचा एकपात्री नाट्यप्रयोग; ‘मी सावली भीमाची’ नाटकाने रचला विश्वविक्रम

Maharashtra News Live Update: पुणे-सातारा महामार्गावर दोन कारची जोरदार धडक; एकाचा मृत्यू, चौघे जखमी

SCROLL FOR NEXT