viral satya breathing disease children soap 
बातम्या

Viral | साबणाने अंघोळ करणं आरोग्यास घातक ?

संदीप चव्हाण

साबणामुळे लहान मुलांना श्वसनाचे विकार होतात असा दावा केला जातोय.दोन हजार मुलांवर रिसर्च केल्यानंतर हे सिद्ध झाल्याचं बोललं जातंय.जन्मापासून तीन ते चार महिने मुलांना साबण लावून रिसर्च करण्यात आला.त्यानंतर अस्थमा किंवा खोकला आहे का याची तपासणी केल्यावर 90 टक्के मुलांना अस्थमा असल्याचं दिसून आलं.त्यामुळे हा दावा खरा आहे का? याची आम्ही पडताळणी सुरू केली.पण, व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहा.

  • व्हायरल मेसेज

कपडे धुण्याचा साबण, भांडी धुण्याचे साबण यांना दोन हजार मुलं सामोरी गेली होती.यातील ज्या घटकात कृत्रिम सुगंध वापरण्यात आला होता.त्यांचा संबंध श्वसनाच्या विकारांशी असल्याचे दिसून आलं.

हा मेसेज व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे.कारण, आपण सगळेजण साबणाचा वापर करतो.लहान मुलांनाही साबण लावून अंघोळ घालतो.त्यामुळं याची सत्यता जाणून घेणं खूप गरजेचं आहे.याबद्दल अधिक माहिती एक्सपर्ट देऊ शकतात.आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे एक्सपर्टला भेटले.त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि खरंच साबणामुळे श्वसनाचे विकार होतात का हे जाणून घेतलं.

साबणांमध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरली जातात.त्यामुळं त्याचा परिणाम लहान मुलांवर होत असतो असं मत बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मंदार देशपांडे व्यक्त केलं.पण, आपण काय काळजी घ्याला हवी हेदेखील जाणून घेतली.त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं वाचा.

  • काय आहे व्हायरल सत्य ?
  • ज्यांना अस्थमा आहे त्या लहान बालकांना त्रास होतो
  • साबण, भांडी धुण्याची रासायनिक द्रव्य असलेली हँडवॉश यासारख्यामुळे त्रास बळावतो
  • या साधनासोबतच माती, धूर, धूळ किंवा प्रदूषित घटकांमुळे अस्थमा होतो 
  • त्रास होऊ नये म्हणून लहान मुलांचे हात, पाय पाण्याने स्वच्छ करणे रामबाण उपाय आहे
  • स्वच्छ धुण्यासाठी रोगप्रतिकारक साबण वापरावे

साबण वापरताना कोणतेही वापरू नका.चांगले साबण वापरायला हवेत.आमच्या पडताळणीत साबणातील केमिकलमुळे श्वसनाचे विकार होतात हा दावा सत्य ठरला.

web tile : viral satya breathing disease children soap

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

Ganesh Visarjan 2025: आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच 'गणेश' गिरणा पात्रात बुडाला, गणेश विसर्जनावेळी राज्यभरातील ५ ठिकाणी विपरित घडलं, १० जण बुडाले

SCROLL FOR NEXT