Laturr
Laturr  
बातम्या

लातूरमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत हजारो बळी

योगेश नाईक

लातूर : कोरोनाच्या  Corona पहिल्या First लाटेत Wave वेगवेगळे Different आजार Disease तसेच वृद्ध व्यक्ती Old अधिक बळी पडल्या. दुसऱ्‍या Second लाटेत मात्र तरुण Young तसेच पन्नाशीच्या आतमधील व्यक्तींचा मृत्यू Death होत आहे. आतापर्यंतच्या एकूण मृत्यूमध्ये इतर आजार नसलेल्या व्यक्तींची संख्या अधिक झाली आहे.  Thousands Died In Second Wave Of Corona In Latur

जिल्ह्यात १५ मेपर्यंत एक हजार ७६८ पैकी कोणताही (Non Covid Diseases) आजार नसलेले एक हजार २६ जण बळी पडले आहेत. या आकडेवारीवरून नागरीकांनी अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज व्यक्त होत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्ण Patients व मृतांची संख्या कमी होती. दुसऱ्या लाटेत विशेषतः मार्च, एप्रिल महिन्यांत रुग्णांची संख्या लक्षणीय वाढली. तर मृत्यूचे प्रमाण दररोज सरासरी ३० राहिले. 

हे देखील पहा -

अनेक जण आजार अंगावर काढत आहेत. स्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णालय गाठत आहेत. अशा वेळी डॉक्टरही हतबल होताना दिसत आहेत. त्याचा परिणाम मृत्यूची संख्या वाढत आहे. वेगवेगळा आजार असलेल्यांना कोरोना झाला तर तो अधिक त्रासदायक ठरतो. त्यातून अधिक मृत्यू होत होते, हे पहिल्या लाटेत दिसले. Thousands Died In Second Wave Of Corona In Latur

दुसऱ्या लाटेत मात्र कोणताही आजार नसलेल्या तरुण, पन्नाशी, साठीतल्या व्यक्ती बळी पडल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ७६८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात एक हजार २६ व्यक्तींना कोणताही आजार नव्हता. ७४२ जणांना मात्र वेगवेगळे आजार होते.

कोरोनाने केवळ साठीतल्या किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांना आपल्या कवेत घेतले असे नाही; तर अनेक तरुणांचाही यात बळी गेला आहे. घरातील कर्ते जात आहेत. आतापर्यंत ५० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या ३०६ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ७० वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ६२२, ६० ते ६९ वयोगटातील ५२७, ५० ते ५९ वयोगटातील ३१३ जणांचाही कोरोनाने मृत्यू झाला आहे. Thousands Died In Second Wave Of Corona In Latur

कोरोनाचा उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत आतापर्यंत १९७ जणांचा मृत्यू झाला आहे. एक ते पाच दिवस उपचार घेतल्यानंतर मृत्यू झालेल्यांची संख्या ८९१ आहे. सहा ते दहा दिवस उपचार घेऊन बळी पडलेल्यांची संख्या ४४० आहे. तर दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस उपचार घेऊनही कोरोनावर मात करू शकले नाहीत, अशांची संख्या २४० आहे.

Edited By : Krushna Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

छत्रपतींच्या गादीचा मान ठेवा म्हणता अन् साताऱ्यातून उमेदवार देता; नितेश राणे कुणावर संतापले?

Election Commission : निवडणूक आयोगाचा ठाकरे गटाला झटका; 'जय भवानी' बाबतचा फेरविचार अर्ज फेटाळला

Hardik Pandya : T20 वर्ल्डकप आणि हार्दिक पंड्याबाबत 'सिक्सर किंग' युवराज सिंहचं मोठं वक्तव्य; रोहित-सूर्याचं नावही घेतलं नाही!

Bhuvan Bam: प्रसिद्ध युट्यूबर भुवनचं शाहरुखच्या पावलावर पाऊल; मुंबईत घेतलं नवकोरं घर

Side Effect Of Haldi Milk: हळदीचे दूध कोणी पिऊ नये?

SCROLL FOR NEXT