sbi new policy 
बातम्या

SBI: पैसे काढणे होणार आता महाग; चेकबुकसाठीच्याही नियमांत बदल  

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठे कर्ज देणारी स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) एटीएम आणि बँक शाखेतून पैसे काढण्यासाठी आणि चेकबुकच्या नियमात बदल करणार आहे. याअंतर्गत ग्राहकांना या सर्व सेवांसाठी शुल्क भरावे लागणार आहे. नवीन शुल्क मूलभूत बचत खाते ठेव खातेदारांना लागू होईल. दुसऱ्या शब्दांत, आता ग्राहकांना एसबीआयच्या एटीएममधून रोकड काढून घेण्यासाठी आणि नवीन चेकबुक घेण्यासाठी फी भरावी लागेल. हे नवीन नियम पुढच्या महिन्यात म्हणजेच जुलै 2021 पासून अंमलात येतील. ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवरील नवीन सेवा शुल्कापासून सूट देण्यात येईल.

एसबीआय बीएसबीडी (Basic Savings Bank Deposit) हा गरीब वर्गासाठी आहे. जेणेकरून पैसे नसले तरी त्यांना खाते उघडण्यास प्रोत्साहित केले जाऊ शकते. त्याला झिरो बॅलन्स सेव्हिंग अकाऊंट असेही म्हणतात. किमान किंवा जास्तीत जास्त शिल्लक रक्कम आवश्यक नाही. या खातेदारांना एटीएम-कम-डेबिट कार्ड मिळते.(SBI: Withdrawal will be expensive now; Changes to the rules for chequebook)

 हे देखील पाहा

वैध केवायसी कागदपत्रे तयार करुन कोणीही एसबीआयमध्ये बीएसबीडी खाते उघडू शकतात. बीएसबीडी खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत रोख पैसे काढ्याची परवानगी असेल. ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत पैसे काढण्याच्या संधी संपल्यानंतर  बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. होम ब्रँच आणि एटीएम आणि एसबीआय नसलेले एटीएमवर रोख पैसे काढण्याचे शुल्क लागू होईल.

आता चेकबुकसाठी भरावे लागतील पैसे  
* एसबीआय बीएसबीडी खातेदारांना आर्थिक वर्षामध्ये 10 धनादेशांची प्रत  मिळते. आता 10 चेक असलेल्या चेकबुकवर फी भरावी लागेल. 10   चेकबुकसाठी  बँक 40 रुपये आणि जीएसटी घेईल.
* एसबीआय 25 पानाच्या चेकबुकसाठी 75 रुपये अधिक जीएसटी घेईल.
* अर्जेंट १० पाणी चेकबुकसाठी 50 रुपये आणि जीएसटी आकाराला जाईल.
* बँक बीएसबीडी खातेदारांकडून होम ब्रांचमधून पैसे काढण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: कोपरी पाचपाखाडीत दोन्ही शिवसेनेच्या कार्यकत्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी

Sharad Pawar News : संग्राम थोपटेंसाठी शरद पवार प्रचाराच्या मैदानात; भोरमध्ये जाहीर सभा

IND vs AUS: भारत- ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका केव्हा, कधी आणि कुठे लाईव्ह पाहता येणार?

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आडवा येतोच कसा? भोंग्यांच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा थेट सवाल

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

SCROLL FOR NEXT