Saam Banner Template 
बातम्या

नागपूरात भेसळयुक्त खाद्यतेलाची विक्री; आरोपींना पोलिसांच्या ताब्यात  

समीरण वाळवेकर ( जेष्ठ पत्रकार )

नागपूरात ब्रॅण्डेड कंपनीच्या नावावर भेसळयुक्त खाद्यतेल विक्री होत असल्याची माहिती पुढं आली आहे. फॉर्च्युन कंपनीचे स्टिकर लावून भेसळयुक्त सोयाबीन खाद्यतेल विकणाऱ्या आरोपींना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर शहरातील जागनाथ भागात बुधवारी भेसळयुक्त तेल विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार त्याठिकाणी असलेल्या प्रेमकुमार गंगवाणी यांच्या महालक्ष्मी ट्रेडर्समध्ये फॉर्च्युन कंपनीच्या सोयाबीन तेलाचे काही पींपे आढळून आले.

हे देखील पाहा

पोलिसांनी सखोल चौकशी केल्यावर अशोक केसवाणी या एजंट मार्फत हे तेल येत असल्याची माहिती मिळाली. तसेच हे खाद्यतेल लकडगंज भागातील शंकर ट्रेडिंगमधील असल्याचं कळल्यावर पोलिसांनी त्याठिकाणी छापा घातला. याठिकाणी 21 तेलाचे खाद्य तेलाचे पिपे आढळून आले. पोलिसांनी भेसळयुक्त तेल जप्त केलं आहे. मात्र, शहरात आणखी किती ठिकाणी असं भेसळयुक्त तेल विक्री केल्या जातं आणि नागरिक खरेदी करत असलेले खाद्यतेल हे ब्रँडेड कंपनीचे आहे की भेसळयुक्त? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. पोलीस या अनुषंगाने सखोल तपास करत आहेत.

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये भीषण अपघात; बस खाली येऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू

BKC मधील स्कायवॉक कधी खुला होणार? अधिकृत तारीख आली समोर

Crime News: आठवीतील विद्यार्थिनीला बळजबरी दारू पाजली; नंतर हॉटेलमध्ये घेऊन गेले अन्... धक्कादायक कृत्यानं खळबळ

Dharashiv : महाराष्ट्रातील प्रसिद्ध हॉटेलच्या बिर्याणीत आढळलं झुरळ, ४० किमीवरून आला, एक घास खाल्ला अन् धक्काच बसला!

Suryakumar Yadav: टीम इंडियातून काढल्यानंतर सूर्या कोपला! 200 च्या स्ट्राइक रेटनं गोलंदाजांची काढली पिसे

SCROLL FOR NEXT