बातम्या

वाचा | जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा चकमक

साम टीव्ही न्यूज

जम्मू-काश्मीर :शोपियाँ जिल्ह्यात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीची आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी रविवारी आणि सोमवारी झालेल्या चकमकींमध्ये एकूण ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. त्यानंतर आज झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याने आठवड्याभरात एकू ११ दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला आहे.जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये मोठी चकमक झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, पोलीस आणि लष्कराचे 44RR पथक आणि केंद्रीय राखीव सुरक्षा बल (सीआरपीएफ) यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी सकाळी ही कारवाई केली. या पथकाने शोपियाँ जिल्ह्यातील सुगू हेंदमा या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, या संयुक्त पथकाने संबंधित भागाला गराडा आणि सर्च ऑपरेशन सुरु केले. दरम्यान, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर सुरक्षा रक्षकांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले.

यामध्ये दोन दहशतवादी ठार झाले असून इतर दहशतवाद्यांना सुरक्षारक्षकांनी घेरले आहे. दरम्यान, चकमक अद्यापच सुरुच आहे. शोपियाँ जिल्ह्यात आठवड्याभरात झालेली ही तिसरी चकमक आहे.

WebTittle : Read | Fighting again in Jammu and Kashmir

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: दसरा सणाला गालबोट! दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान अनर्थ घडला, ६ जण नदीत बुडाले

How to Impress People: ऑफिस, इव्हेंट किंवा पार्टीमध्ये लोकांना इंप्रेस कसं करायचं, जाणून घ्या सिक्रेट टिप्स

Rahul Gandhi Speech : भारताला सर्वात मोठा धोका....विदेशात जाऊन पुन्हा बोलले राहुल गांधी, भाजप संतापला

Maharashtra Dasara Melava Live Update: शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यासाठी कल्याणमधील शिवसैनिक शिवाजी पार्ककडे रवाना

Employee Layoff : नोकरी सांभाळा! TCSनंतर आणखी एका बड्या कंपनीत नोकर कपात; अनेकांना नोटीस न देताच कामावरून काढलं

SCROLL FOR NEXT