corona 960 saloon pune 
बातम्या

हजामत बंद! पुण्यात कोरोनामुळे आता सलूनही बंद राहणार

सागर आव्हाड

पुणे - पुण्यात 3 दिवस दुकानं बद करण्यात आली आहेत. पुण्यात आता सलून दुकानंही बंद राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 2 ते 3 दिवस सलून दुकानं बंद ठेवण्यात येणार आहे.

आजच (17 मार्च) पुण्यात आणखी एक कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं आहे. राज्यातील कोरोनोबाधितांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसतंय. देशात कोरोनाबाधितांची संख्या 148वर पोहोचलीय तर राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42 वर पोहोचली आहे. त्यातही पुण्यात सर्वाधिक कोरोनाबाधितांची संख्या आहेत. त्यामुळे पुणेकरांची चिंता आणखी वाढलीय आहे. 

पुण्यातील हॉटेल्सचंही शटर डाऊन

पुण्यात कालपासून हॉटेल्सही बंद ठेवण्यात आले आहेत. तसंच कोरोनामुळे पुण्याचे रस्ते निर्जन झालेत. तसंच लोकांनीही घरातच राहणं पसंत केलंय. त्यामुळे बाजारपेठांसह पुण्यातल्या महत्वाच्या रस्त्यांवर निरव शांतता पसरली आहे. कोरोनामुळे नागरिकांनी एकत्र जमण्यावर बंधनं घातली जात आहेत. व्यापाऱ्यांपाठोपाठ शहरातील हॉटेल, बार-रेस्टॉरंटही तीन दिवस बंद आहेत.

कोरोनामुळे बस फे-यांवरही परिणाम

दुसरीकडे पुणे PMPL बसमध्ये  निर्जंतुकीकरणाची फवारणी करण्यात आलीय...कोरोमाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात आलीय...रात्रीच्या सुमारास डेपो परिसरामध्ये सर्व गाड्यांमध्ये  निर्जंतुकीकरण करण्यात आलं.PMPL बसने अनेक जण प्रवास करत असतात आणि या गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.

तसंच पुण्यातील 548 फे-या रद्द करण्यात आल्या आहेत. पुण्यात फक्त PMPML च्या फक्त 1000 बसवर काम चालवलं जाणार आहे. सकाळी आणि संध्याकाळच्या टप्प्यात या फे-या कमी जास्त प्रमाणात गरजेनुसार वाढवण्यात येऊ शकतात.

पाहा व्हिडीओ - 

pune corona saloon will remain closed maharashtra marathi india international

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident News : देवदर्शन घेऊन निघाले, ४ किमीनंतर भयानक अपघात, नवले ब्रिजवर अख्ख्या कुटुंबाचा अंत

Maharashtra Live News Update: नवले ब्रीज अपघात प्रकरणी मुरलीधर मोहोळ घटनास्थळी पाहणी करणार

लग्नसराईत सोनं स्वस्त! २४ कॅरेट १० तोळं सोन्याचे भाव ८ हजारांनी घसरले, वाचा आजचा लेटेस्ट दर

Bihar Election Result Live Updates: तेजस्वी यादव फक्त ८०० मतांनी आघाडीवर

Bihar Election Result: सत्तेच्या चाव्या ६ मतदारसंघात, या ठिकाणी जिंकणाऱ्यांचेच सरकार, पाहा १९७७ पासूनचा ट्रेंड काय सांगतो...

SCROLL FOR NEXT