fraud sangli 
बातम्या

जर्मनीत डॉक्टर असल्याचे सांगून वकील महिलेला 15 लाखांचा गंडा...

साम टीव्ही न्यूज .

सांगली - जर्मनीत germany डॉक्टर docto असल्याचे सांगत सोशल मीडियाच्या Social Media माध्यमातून मुंबईतील Mumbai एका वकील महिलेची 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. विटा येथील लेंगरे गावातील एका तरुणाने हा प्रताप केला आहे. त्याच्या विरोधात विटा पोलीस Police ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. pretended to be a doctor in germany sangli youth cheats lawyer 

सांगलीच्या विटा जवळील लेंगरे येथे वैभव शिंदे नावाचा तरुण राहतो. कोरोनामुळे महाराष्ट्र आणि शहरे लॉकडाऊन झाली. त्यामुळे या काळात आधार होता तो मोबाइलचा. वैभवला देखील लॉकडाऊन काळात मोबाईलच आधार होता. त्यामुळे त्या काळात वैभवने  फेसबुक आणि इन्स्टाग्राम वर शक्कल लढवत भरत जाधव या नावाने खोटे अकाउंट काढले. परदेशात राहतोय असे भासावे म्हणून त्याने मॉडेल सारखे फोटो फेसबूक, इंस्टाग्रामवर लावला. मग अनेक लोकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायला. यातील एक रिक्वेस्ट मुंबईतील एका महिला वकीलाला पाठवली.

फेसबुक आणि इन्स्टंग्राम या या सोशल मीडियावर वैभव शिंदे याने त्याच्या प्रोफाईलमध्ये तो जर्मनी या देशात डॉक्टर व्यवसाय करत असल्याची खोटी माहिती दिली होती. मुंबईतील या वकील महिलेने वैभवने बनवलेल्या अकाउंट वर चॅटिंग करायला सुरवात केली. कधी हिंदी, तर कधी मराठीत चॅटकरून वैभव शिंदे याने त्या महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर वैभवने आपला मोबाईल क्रमांक महिला वकिलाशी चॅटद्वारे शेअर केला. त्यानंतर व्हाट्सअ‍ॅपवरच्या माध्यमातूनही या दोघांचे चॅटिंग सुरू झाले. pretended to be a doctor in germany sangli youth cheats lawyer 

व्हॉटसअप द्वारे मसेजेस, फोन कॉल करुन आणखी विश्वास संपादन केला. मात्र यादरम्यान  वेगवेगळी कारणे सांगून या महिला वकिलाकडून वैभव शिंदेने वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तब्बल १४ लाख ९२ हजार रुपये घेतले. ही रक्कम महिला वकिलांकडून घेताना त्याने आपली आई कोरोनाने आजारी आहे.आपले वडील आजारी आहेत. चुलते वारले, बहिणीच्या नवऱ्याची प्रकृती गंभीर आहे. मुंबईमध्ये आल्यावर पैसे देतो असे म्हणून पैसे मागितले.

हे देखील पहा -

अखेरीस ७ जूनला वैभव शिंदे याने अचानक सोशल मीडियावरची आपली भारत जाधव नावाने काढलेली सगळी अकाऊंटस बंद  केली आणि आपली फसवणूक झाल्याचे कळताच वकील महिलेने सायबर क्राईम विभागाशी संपर्क साधला.  त्यावरून संबंधित नंबर सांगली जिल्ह्यातील लेंगरे गावातील वैभव शिंदे यांचा असल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर तत्काळ या वकील महिलेने विटा पोलिस ठाण्याकडे धाव घेतली.  शिवाय दोघांमधील संभाषणाचे आणि वैभव शिंदे यांना वेळोवेळी पैसे दिल्याचे पुरावे दिले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याला अटकही करण्यात आली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sitaare Zameen Par Collection: बॉक्स ऑफिसवर चमकले आमिर खानचे नशिब; गुरुवारी केली इतक्या कोटींची कमाई

Maharashtra Live News Update: अमित शाह यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या झाडाझडतीत एकाकडे सापडली पिस्तुल

पँटची चैन उघडली अन्..., ट्रेनमध्ये तरुणीकडे पाहून तरुणाचं अश्लील कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Fake Charger: मोबाईल चार्जर खरे आहे का बनावट? खरेदी करताना ‘हे’ तपशील नक्की तपासा

Deepika Padukone Fitness: प्रेग्नेसीनंतर दीपिका पादुकोण इतकी फिट कशी? पाहा आताचे नवीन फोटो

SCROLL FOR NEXT