air force 
बातम्या

महाराष्ट्राच्या मदतीला एअर फोर्स, एअरलिफ्टने नाही तर 'या' मार्गाने येईल महाराष्ट्रात ऑक्सिजन

साम टिव्ही ब्युरो

पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांनी आज कोरोना व्हायरसचा Corona प्रादुर्भाव जास्त असलेल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली. यावेळी पंतप्रधानांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना  कोरोनाचा सामना करताना  काय अडचणी येत  आहेत, याची विचारणा केली. Oxygen will come to Maharashtra with the help of Air Force

त्यानंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे Rajesh Tope यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात  कायचर्चा झाली यांची माहिती दिली. पंतप्रधानांसोबत झालेल्या चर्चेमध्ये ऑक्सिजन Oxygen संदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय झाला आहे. महाराष्ट्राला ऑक्सिजनचा साठा लवकरात लवकर मिळावा, यासाठी इंडियन एअर फोर्स Indian Air Force मदत करणार आहे.

महाराष्ट्राला अन्य राज्यांकडून ऑक्सिजन मिळत आहे पण ऑक्सिजन पोहोचायला विलंब लागत असल्याच्या मुद्दा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मांडला. विशाखापट्टण मधून ऑक्सिजन घेऊन ट्रेन निघाली आहे, पण या ट्रेनला पोहोचायला उशिर होतोय.महाराष्ट्रात ऑक्सिजन एअर लिफ्टींगने पोहोचवता येईल का? अशी विचारणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली. त्यावर पंतप्रधानांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असे  राजेश टोपे यांनी सांगितले. Oxygen will come to Maharashtra with the help of Air Force

त्यानंतर राजेश टोपे म्हणाले, आपल्या ऑक्सिजन आणण्यासाठी ज्या राज्यातून कोटा मिळालाय, तिथे एअर फोर्सच्या मालवाहतूक विमा नांमधून रिकामे टँकर्स पाठवले जातील. त्या टँकर्समध्ये ऑक्सिजन भरल्यानंतर रेल्वे मार्गाने किंवा जवळचे ठिकाणं असेल, तर रस्ते मार्गाने ऑक्सिजन महाराष्ट्रात येईल.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT