Reasons for e-pass during lockdown 
बातम्या

ओ... हनिमूनला जायचं आहे, ई- पास पाहिजे ! नागरिकांची अफलातून कारणे

अशोक सुरवसे

नागपूर - लॉकडाऊनच्या काळात फक्त अत्यावश्यक कामासाठी संबंधितांना शहराबाहेर जाता यावं यासाठी सरकारनं ई-पासची सुविधा उपलब्ध करून दिली होती.
परंतु, काही महाभागांनी ई-पाससाठी अफलातून कारणे दिल्याचे पुढे आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हनिमूनला जायचं आहे, घरी कंटाळा आला म्हणून गावाला जायचं आहे, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचं आहे, अशी अनेक अफलातून कारणे दिली आहेत. परंतु अशी कारणे सांगितलेले 60 ते 70 टक्के अर्ज नामंजूर करण्यात आले आहे. Oh ... I want to go for honeymoon, I want an e-pass! To overwhelm the citizens

हे देखील पहा - 

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आळा घालण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन लावला आहे. यामुळे  फक्त अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीनाच घराबाहेर पाडता येत होते. ज्यांना अत्यावश्यक कामासाठी शहराबाहेर जायचं आहे.  त्यांच्यासाठी इ-पासची सोय केली होती. त्यासाठी कारणं द्यायची होती. मे ते एप्रिल महिन्यात 49 हजार 689 जणांनी अर्ज केला होता. यातील 16 हजार व्यक्तींनी संयुक्तिक कारणे दिल्यानं त्यांचे अर्ज मंजूर करण्यात आले. मात्र, 33 हजार अर्ज नामंजूर करण्यात आले. कारण त्यांनी दिलेली कारणे अफलातून आणि न पटणारे होते. हनिमूनला जायचं आहे, घरी कंटाळा आला गावाला जायचं आहे, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचं आहे, अशी कारणे या महाभागांनी दिली होती अशी माहिती  पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी दिली आहे. 

ऑनलाईन अर्ज केल्यावर 24 तासात टोकन दिले जात होते. पोलीस ठाणे किंवा थेट पोलीस उपायुक्त कार्यालयात अर्ज करता येत होता. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि संयुक्तिक कारणे द्यावी लागत होती. मात्र, योग्य कारणे नसल्यानं हे अर्ज नाकारण्यात आले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी दिली आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सरकारला लॉकडाऊन करावे लागले. परंतु,  याचं काही महाभागांना किती गांभीर्य होतं, हे या अर्जातील कारणांवरून दिसून आले आहे. कोरोना विषाणुला संयम आणि नियमांचं पालन केल्यानं हरवता येतं. परंतु , अशा महाभागांना कोरोनाचं अजूनही गांभीर्य नसल्याचं दिसून येत आहे. 

Edited By - Puja Bonkile 


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ठाकरे गटाला दिवाळीत बंपर लॉटरी! भाजपमधील महिला नेता शिवसेनेच्या वाटेवर, लवकरच पक्षप्रवेश होणार

Ranjeet Kasle : झुकेगा नहीं.. बीडच्या रणजीत कासलेच्या मुसक्या आवळल्या, अटक करताच केली पुष्पाची स्टाईल

Diwali 2025: दिवाळीच्या दिवशी 'ही' 5 कामं नक्की करा; घरात लक्ष्मीचं होईल आगमन

Gold Rate: १० वर्षात १ लाखानं वाढलं सोनं, २०१५ मध्ये किती रूपये तोळा होतं गोल्ड? वाचा १०० वर्षाचा इतिहास

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT