helmet  
बातम्या

आता स्टँडर्ड हेल्मेटच घालावे लागणार : केंद्राच्या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू

अशोक सुरवसे

नागपूर - तुम्ही घालत असलेले हेल्मेट स्टँडर्ड standard helmet आणि मानांकित आहे का हे तापासून घ्या. कारण आता मानांकित नसलेले आणि लोकल हेल्मेट Local  helmet  घातल्यास तुम्हाला दंड ठोठावला जाऊ शकतो. केंद्र सरकारने 1 जूनपासून दुचाकी स्वाराला स्टॅंडर्ड आणि मानांकित हेल्मेट घालण्याची सक्ती केली आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. Now you have to wear a standard helmet: Implementation of new rules of the Center has started

हे देखील पहा - 

गेल्या काही वर्षात नामांकित नसलेले हेल्मेट घातल्यानं 44 हजार 666 लोकांचा मृत्यु झाला आहे . त्यामुळे गेल्या वर्षी केंद्रीय रस्ते वाहतुक आणि महामार्ग मंत्रालयाने एक सूचना जारी केली होती. यामध्ये भारतीय मानांकित विभागानं मंजूर केलेल्या हेल्मेटची विक्री आणि त्याचा वापर करणे बंधनकारक केले आहे.

मानांकन नसलेल्या हेल्मेटची विक्री किंवा साठवणूक केल्यास 2 लाख रुपये दंड किंवा 1 ते 5 वर्षापर्यंतचा दंड ठोठावला जाणार आहे. हेल्मेट न घालणाऱ्यांना सुद्धा मोठा दंड ठोठावला जाणार आहे. 

नागरिकांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र, मानांकित नसलेले हेल्मेटचे उत्पादन आणि विक्री होऊ नये, जेणेकरून नागरिकांना ते खरेदी करता येणार नाही. तसेच जर 
सरकारनं असे नामांकित हल्मेट नागरिकांना कमी किंमतीमध्ये उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचनाही केल्या आहेत. 

गेल्या काही वर्षात नामांकित हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या मृत्यूची संख्या लक्षात घेता केंद्र सरकारनं घेतलेला हा निर्णय योग्यच आहे. मात्र, या निर्णयाची योग्य अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांमध्ये हेल्मेटचं महत्व आणि कमी किंमतीत चांगल्या कंपनीचे हेल्मेट कसे उपलब्ध होतील, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे असे नागरिकांनी मत व्यक्त केले आहे. 

Edited By - Puja Bonkile 
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Navratri Festival : नवरात्रीची अनोखी परंपरा; कडक उपवासात ९ दिवस बसायचं नाही, झोपायच पण तेही उभं राहून

IND vs SL: श्रीलंकेविरूद्ध टीम इंडियामध्ये ३ बदलांची शक्यता; फायनलपूर्वी 'या' खेळाडूंना मिळणार संधी, पाहा कशी असेल प्लेईंग 11

Devoleena Bhattacharjee: गोपी बहूचे बेबी बंप फोटो व्हायरल; चाहत्यांना देणार पुन्हा गोड बातमी?

Sanjay Raut : PM केअर फंडाच्या मदतीने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा, ठाकरेंच्या खासदाराची मागणी | VIDEO

Tadoba Andhari Tiger Reserve : ताडोबातील वाघाचे दर्शन महागणार, 1 ऑक्टोबरपासून सफारी दरात वाढ; किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT