बातम्या

नाइट लाइफमुळं मुंबईत निर्भयासारख्या घटना घडतील: राज पुरोहित

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या 'नाइट लाइफ'च्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे. 

मुंबईत २४ तास मॉल, रेस्तराँ, आणि पब खुले राहिले तर त्यामुळं मद्यसंस्कृती वाढेल आणि त्यामुळं महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. निर्भयासारख्या हजारो घटना उघडकीस येतील.

शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या 'नाइट लाइफ'च्या प्रस्तावाला भाजप नेते राज पुरोहित यांनी विरोध दर्शवला आहे. मुंबईत २४ तास मॉल, रेस्तराँ, आणि पब खुले राहिले तर त्यामुळं मद्यसंस्कृती वाढेल आणि त्यामुळं महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होईल. 

निर्भयासारख्या हजारो घटना उघडकीस येतील. त्यामुळं अशी संस्कृती भारतासाठी चांगली ठरेल का याचा त्यांनी विचार करायला हवा, असं पुरोहित म्हणाले.

मुंबईत नाइट लाइफ सुरू करणार, असे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले असले तरी, त्यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी असमर्थता व्यक्त केली होती. 'मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या बंदोबस्ताबाबत पोलिसांनी अद्याप तयारी केलेली नाही.

त्यामुळे येत्या २६ जानेवारीपासून नाइट लाइफचा प्रारंभ अशक्य आहे', असं देशमुख यांनी स्पष्ट केलं होतं. आता या नाइट लाइफच्या प्रस्तावावर भाजप नेते राज पुरोहित यांनी वक्तव्य केलं आहे. मुंबईतील नाइट लाइफ तरुणांना चुकीच्या मार्गावर घेऊन जाईल. त्यामुळं बलात्काराच्या घटना वाढतील आणि कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खात्यात आवश्यक मनुष्यबळ नाही, असं ते म्हणाले.

WebTittle::  Nightlife will cause fearless events in Mumbai: Raj Purohit


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डोंबिवलीत FDAची धडक कारवाई; सांगलीहून आणलेले ५०० लिटर भेसळयुक्त सुटे दूध जप्त

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT