बातम्या

तुमचा दिवसाचा इंटरनेट डेटा रात्रीत संपतो? 'हे' आहेत अगदी स्वस्त प्लान

सकाळ वृत्तसेवा

तुम्हाला वेबसिरीज पाहायला खूप आवडतं? एका रात्रीत तुम्ही वेबसिरीजचा एक सीजन जर संपवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. Jio, Airtel आणि Vodafone-Idea ने तुमच्यासाठी खास हे प्लान आणलेत.

Reliance Jio, AirTel आणि Vodafone-Idea कडे रोज वापरण्यात येणारे अनेक अनलिमिटेड डेटा प्लॅन आहेत. यामध्ये दररोज 3 GB पर्यंतचा डेटा प्रत्येक दिवशी मिळतोय. मात्र असे अनेक ग्राहक आहेत, जे त्यांचा हा डेटा लवकर संपवून टाकतात. अशा ग्राहकांसाठी कंपनी डेटा प्लान उपलब्ध करून देतात. हा पॅक वापरून ग्राहकांना इंटरनेट वापरता येतं. आज आम्ही तुम्हाला Reliance Jio, Airtel आणि Vodafone-Idea च्या पन्नास रुपयांपेक्षा कामीच्या डेटा प्लान बद्दल माहिती देणार आहोत. 

Reliance Jio
Jio कडे पन्नास रुपयांपेक्षा कामीचे दोन डेटा प्लान आहेत. यातील एक मात्र अकरा रुपयांचा आहे. यामध्ये ग्राहकांना 400 MB चा डेटा मिळतो. दुसरा प्लान आहे 21 रुपयांचा. यामध्ये ग्राहकांना 1 GB  डेटा मिळतोय. या दोन्ही डेटा प्लान ची वैधता तुमच्या सुरु असलेल्या प्लान प्रमाणे राहते.  याचसोबत फक्त एकावन्न रुपयांचा देखील डेटा पॅक तुम्हाला मिळतो. यामध्ये तुम्हाला तब्बल 3 GB डेटा मिळतो.  

 Vodafone-Idea
आता जाणून घेऊयात Vodafone-Idea बद्दल. यामध्ये पण पन्नास पेक्षा कमी दारात दोन डेटा प्लॅन आहेत. यामध्ये पहिला प्लॅन माफक 16 रुपयांचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला एका दिवसाच्या वैधतेसोबत 1 GB डेटा वापरायला मिळतो. 48 रुपयांच्या प्लॅन मध्ये तुम्हाला 28 दिवसांची वैधता आणि 3 GB डेटा उपलब्ध होतो.   

AirTel
आता जाणून घेऊयात AirTel बद्दल. AirTel कडे फक्त एकच पन्नास रुपयांच्या आतील प्लान आहे. हा प्लॅन आहे 48 रुपयांचा. यामध्ये तुम्हाला  28 दिवसांची वैधता आणि 3 GB डेटा मिळतो  

Webtitle : new very cheap data plans by vodafone airtel and jio

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: 'या' टीप्स फॉलो केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Today's Marathi News Live : मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी 'वोट फॉर स्ट्रॉंग गव्हर्नमेंट' अभियान

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाची कारला धडक, भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, दोघे जखमी

Marathwada Water Crisis: मराठवाड्यावर भीषण जलसंकट; फक्त १७ टक्के पाणीसाठा शिल्लक

Crime News: शिवी दिल्याच्या रागातून भयंकर कांड.. चौघांनी मिळून जिवलग मित्राला संपवलं; छत्रपती संभाजीनगरमधील घटना

SCROLL FOR NEXT