naxalites  
बातम्या

मराठा आरक्षणावर नक्षलवाद्यांची भूमिका, वाचा सविस्तर...

अक्षय कस्पटे

गडचिरोली : आरक्षण (Reservation) हा खुळखुळा असून त्यावर आपली शक्ती खर्च घालत बसू नका. मराठा (Maratha) समाजातील दलाल (Broker) नेत्यांपासून (Leaders) सावध राहा. हे नेते तुमच्यातील संघटित शक्तीला स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी वापरत आहेत, अशी भूमिका नक्षलवाद्यांनी मांडली आहे. Naxals publish leaflets on Maratha reservation read more

अशा आशयाचे पत्रक भारतीय कम्युनिस्ट पार्टी Communist Party of India (Maoist) (माओवादी) यांनी छापून मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर पहिल्यांदाच उघड भूमिका जाहीर  (Naxals exposed role) केली आहे. 

मराठा समाजाला आरक्षणासाठी लढावे लागत असणे म्हणजेच देशावरील कृषी संकटाचा भाग आहे. आरक्षण (Reservation) कोणत्याही समाजाला न्याय व समानता देऊ शकत नाही.

हे देखील पहा -

काळाच्या ओघात जसे अन्य समाजीतील नागरिकांमध्ये बदल होत आहे तसाच बदल हा मराठा समाजातही होत आहे. स्वताच्या कष्टावर जगणारा हा मराठा शेतकरी (Farmer) समाज आज आरक्षणासाठी ओरडत आहे. ही समस्या म्हणजे देशीतील कृषी संकटाचेच लक्षण आहे. याला सरकारी धोरण जबाबदार, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

सर्वच पक्षातील नेत्यांची नियत खोटी असून ते मराठा समाजाचे हीत कधीच साधणार नाहीत. मराठा समाज त्यांना केवळ वोट (Vote Bank) बँकेसाठी पाहीजे आहे. महाराष्ट्राच्या सत्तेवर सर्वाधिक काळ मराठा समाजातून येणारे नेते मंडळी राहिले आहेत. असे असून देखील मराठा समाजाची अश्याप्रकारे अधोगती का झाली असा सवालही पत्रकात विचारण्यात आला आहे. 

Edited By : Krushnarav Sathe 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लासलगावचा कांदा आता दिल्लीच्या दिशेने रवाना

Blood pressure medicines: BP ची औषधं घेताय? मग या 7 चुका करणं आजच टाळा

देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत! राज्यातील बड्या नेत्याची इच्छा; राजकीय चर्चांना उधाण

बदल्यांचा धडाका सुरूच! 31 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलिस दलात मोठी खळबळ

Shocking: गेस्ट हाऊसच्या खोलीत ५ जणांचा संशयास्पद मृत्यू, एकाच कुटुंबातील सदस्यांसोबत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT