Uddhav Thackeray Press Conference  ,  Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Press Conference , Uddhav Thackeray 
बातम्या

VIDEO | 'चुकीच्या माणसांसोबत एकत्रित गेलो यांची खंत वाटतेय'

सकाळ न्यूज नेटवर्क

मुख्यमंत्रिपदावरून महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच शिगेला पोहोचलाय. काळजीवाहू मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं. त्यानंतर लगेचचं उद्धव ठाकरे यांनी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलंय. महाराष्ट्रातील काळजीवाहू मुख्यमंत्री त्यांचीच सत्ता स्थापन होणार असं म्हणत असतील तर त्यांनी ते नक्की करावं. लोकशाहीत ज्यांच्याकडे आकडे असतील तेच सरकार स्थापन करू शकतात. आणि असं झालं तर आमच्यासमोर सर्व पर्याय खुले असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय.  महाराष्ट्राला खऱ्या खोट्याच्या प्रश्नात फसवू नका, महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या परिवारावर जेवढा विश्वास आहे तेवढाचं अविश्वास अमित शाह आणि कंपनीवर आहे असं वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त  यांनी केलाय. 

पत्रकार परिषदेत काय म्हणालेत उद्धव ठाकरे : 
काळजीवाहू मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पाहून काळजी वाटली 
त्यांनी केलेल्या अचाट कामांचा आढावा घेतल्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो 
त्यांनी केलेल्या अचाट कामं आम्ही नसतो तर ते करू शकले असते का ?
'ते' जर सरकार स्थापन करणार असल्याचं सांगत असतील तर त्यांनी तसं करावं. त्यानंतर आम्ही आमचे पर्याय खुले करू 
गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात आम्ही राजकारण येऊ दिलं नाही, आम्ही शब्द देताना विचार करून शब्द देतो. 
कुणालाही शब्द देताना शंभरवेळा विचार करा, लाखवेळा विचार करा किंवा त्यापेक्षा जास्तवेळा विचार करूनच शब्द द्या अशी बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे 
माझ्यावर केल्या गेलेल्या खोटेपणाच्या आरोपांनी मला दु:ख झाल्यात. मला खोटं ठरवणे हे अत्यंत क्लेशदायक आहे. 
देवेद्र फडणवीस यांनी अमित शाह यांचा संदर्भदेत माझ्यावर खोटेपणाचा आरोप केलाय 
आमच्यात काय ठरलं याचे तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. मी आज सर्व मुद्दे घेऊन आलो आहे. 
चर्चेसाठी मी दिल्लीला गेलो नव्हतो, अमितभाई माझ्या गरि आले होते.   
या आधीदेखील आमची अडीच-अडीच वर्ष सत्ता स्थापन करण्यावर चर्चा सुरु होती. उपमुख्यमंत्रिपद घेण्याएवढे आम्ही सत्तेसाठी लाचार नाही.   
मी शिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वचन दिलं आहे. ते मी पाळणारच. त्यावर शाह किंवा फडणवीस यांच्या दाखल्याची गरज नाही.   
अमित शहांचा मला फोन आला, त्यांनी विचारलं क्या चाहते हो, ते हे देखील म्हणालेत ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री. यावर मी मी नाही म्हणालो म्हटलो 
आम्ही सेनाप्रमुखांच्या खोलीत बसून चर्चा करत होतो 
माझ्यामुळे युतीतील 'रिश्ता' खराब झालाय, तो माझ्या कार्यकाळात नीट करू असंदेखील अमित शाह म्हणाले असल्याच उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं.   
'पद आणि जबाबदारी यांचं समसमान वाटप हे ठरलं होतं' माझं मराठी कच्च नाही
गोड बोलून यांनी मिठी मारली 
फडणवीस होते म्हणून मी पाठींबा दिला 
मला खर्या खोट्याच्या दाखल्याची गरज नाही 
मुख्यमंत्र्यांचं अनौपचारिक स्टेटमेंट अत्यंत दु: खद
खातेवाटपाबाबत मी अमित शाह यांच्याशी चर्चा केली होती. मात्र, जे खातं नको ते आमच्या गळ्यात मारण्या  मारण्यात आलं
मी भाजपला शत्रुपक्ष मनात नाही, फक्त त्यांनी खोटं बोलू नये 
नोटबंदीवेळी 'मुझे 50 दिन दो' हे कोण खोटं बोललं हे सर्वांना माहित आहे
मी भाजपची अडचण समजून घेतली, ज्या जागा दिल्या ते देखील मी समजून घेतलं 
आम्ही मोदींवर टीका केलेली नाही. मात्र, मोदींचं मला 'लहान भाऊ' बोलणं कुणाच्यातरी पोटात दुखलं असेल 
शब्द देऊन मागे फिरण्याची वृत्ती आमची नाही 
आमचं आधी ठरलं होतं मात्र आता आम्ही ते देणार नाही हे भाजपने स्पष्ट करावं 
गंगा साफ करताकरता याचं मन कलुषित झाली, सत्तेची लालूच एवढ्या थराला गेल्याचं मला वाईट  वाटतंय.    
संघाबद्दल आम्हाला नक्कीच आदर आहे. खोटं बोलणं कोणत्या हिंदुत्त्वात बसतं हे RSS  ने सांगावं 
चुकीच्या माणसांसोबत एकत्रित गेलो यांची खंत वाटतेय
जुने व्हिडीओ दाखवत भाजपची पोलखोल करण्याचा उद्धव ठाकरे केला प्रयत्न 
बहुमत नसताना आमचंच सरकार येणार असं कसं सांगितलं जातंय 
मला खोटं ठरवणाऱ्या लोकांशी मी बोलणार नाही 
शिवसेना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत बोलतेय असं ते म्हणतायत. पण मी चोरून मारून बोलत नाहीये उजळ माथ्यानी बोलतोय
जेवढा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल आहे तेवढाच अविश्वास अमित शाह आणि कंपनीवर अविश्वास आहे 
झालेल्या चुका सुधारा 
युतीच्या चर्चेसाठी दरवाजे बंद केलेले नाही. माझ्यावरील खोट्या आरोपांमुळे मी चर्चा थांबवली 
मला चर्चा करण्यासाठी दूताची गरज नाही. दूध का दूध और पानी का पानी करा 
आम्ही एवढे घाव घातलेत तर माझ्याकडे धाव का घेतली 
पुढे ते असंच म्हणत असतील तर 'मी त्यांच्यासोबत रिश्ता ठेवणार नाही' 
मी शिवसेनाप्रमुख यांना जे वचन दिलं आहे ते मी पूर्ण करणार, जे वचन मी त्यांना दिलंय त्यावर मी ठाम आहे,
संपूर्ण महाराष्ट्रात आज ओला दुष्काळ, जणू काही तशीच परिस्थिती झालेली आहे. 
शेतकरी पूर्ण उध्वस्त झाला आहे, शेतकऱ्यांच्या शेताची तळी झाली आहे. 
हे सुरू असताना मला एका गोष्टीचं वाईट वाटते की कर्जमाफी अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेली नाही
शब्द देऊन फिरवणारी जी वृत्ती आहे, ती आमची नाही. पण एकूणच खरं कोण आणि खोट कोण यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेला उल्लू बनवण्याच काम त्यांनी थांबवलं पाहिजे 
मी भाजपला शत्रुपक्ष मानत नाही फक्त त्यांनी खोटं बोलू नये कारण खोटं बोलण्याची परंपरा ही शिवसेनेची असू शकत नाही.
जे जमतं ते मी करेन तेच मी बोलेन, जे जमणार नसेल ते मी वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलणार नाही कारण मी भाजपवाला नाही आहे.

Web Title : Uddhav Thackeray Press Conference In Shivsena Bhavan

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brazil Flood: ब्राझीलमध्ये विनाशकारी महापूर, हजारो घरे पाण्याखाली; आतापर्यंत ५७ जणांचा मृत्यू

Horoscope Today: कटकटी वाढतील, शत्रू त्रास देतील; या ४ राशींच्या लोकांना आज राहावं लागणार सावध, वाचा राशिभविष्य

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

SCROLL FOR NEXT