बातम्या

रंगीला गर्लची काँग्रेसमधली 'दौड' थांबली; पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेससोबत 'जुदाई'

सुमित सावंत साम टिव्ही मुंबई

लोकसभा निवडणुकीपूर्वी गाजावाजा करत काँग्रेसवाशी झालेल्या उर्मिलानं पक्षाला सोडचिठ्ठी दिलाय. पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं तिनं म्हटलंय. राजीनामा देतांना उर्मिलानं काँग्रेस नेतृत्वाला दोषी ठरवलंय.

मुंबई काँग्रेस अध्यक्ष मिलींद देवरा यांना मी १६ मे रोजी पाठवलेल्या पत्रावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, या पत्रातील गोपनीय माहिती नंतर सोयीस्करपणे माध्यमांना पुरवण्यात आली.  या पत्रात ज्यांची नावं होती त्या उत्तर मुंबईतील काही जणांना त्यांच्या निवडणुकीतल्या वाईट कामगिरीबाबत जाब विचारण्याऐवजी चांगली पदं देण्यात आली. उर्मिला मातोंडकरनं केलेले हे आरोप काँग्रेसनं मात्र फेटाळलेत.

उर्मिला मातोंडकरनं भाजपच्या गोपाल शेट्टींविरोधात उत्तर मुंबई मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. पण त्यांचा  दारुण पराभव झाला होता. त्यानंतरही उर्मिला काँग्रेसमध्ये सक्रीय होती. मात्र आता काँग्रेसच्या गटा-तटाच्या राजकारणाला कंटाळून तिनं राजीनामा दिलाय. मुंबई काँग्रेसमध्ये गटा-तटाचं राजकारण तसं नवं नाही मात्र त्याचा आता उर्मिलालाही फटका बसलाय. प्यार तुने क्या किया है असं म्हणणाऱ्या उर्मिलावर आता काँग्रेस तुने ये क्या किया असं म्हणण्याची वेळ आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानींचा एल्गार; वीज, पाणी, ऊसबिलांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत किती पैसे मिळाले? घरबसल्या काही मिनिटांत करा तपास

गेमिंग झोन सेंटरला भीषण आग; १५ जणांचा होरपळून मृत्यू,जीव वाचवण्यासाठी अनेकांच्या खिडकीतून उड्या|Video Viral

Pune Fort : दोन शिखरे, भव्य इतिहास अन् स्वर्गाहून सुंदर निसर्ग; पुण्यात लपलाय 'हा' किल्ला

Pune: परवानगीशिवाय स्मार्ट मीटर लावाल तर गाठ माझ्याशी... पुणेकर वकिलाचा वीज कंपन्यांना 'पुणेरी' स्टाईलने कडक इशारा

SCROLL FOR NEXT