बातम्या

#SmartPuneCity डिजिटल नेटवर्कपासून दूर राहण्याची शक्यता

सकाळ न्यूज नेटवर्क

पुणे - इंटरनेटवरील नागरिकांचे अवलंबित्व वाढत असतानाच ऑप्टिकल फायबर केबल नेटवर्कचे जाळेही विस्तारत आहे. मात्र, हे जाळे पुण्यात पसरविण्यासाठी महापालिकेचे केबल डक्‍ट अपुरे पडत आहेत. त्यामुळे डिजिटल  नेटवर्कपासून स्मार्ट सिटीतील पुणेकर दूर राहण्याची शक्यता आहे. 

महापालिकेला उत्पन्न?
नागपूर आणि पिंपरी- चिंचवडमध्ये प्रत्येकी ४५० आणि ७५० किलोमीटरच्या डक्‍टचे काम सुरू आहे. या दोन्ही महापालिका ते डक्‍ट मोबाईल कंपन्यांना भाडेतत्त्वावर देऊन दरमहा शुल्क आकारणार आहेत. पुण्यातही अशीच योजना आहे. त्यासाठी सुमारे १९० कोटींच्या निविदांनाही मंजुरी दिली आहे. त्यातून महापालिकेला दरवर्षी किमान ५०० कोटींचे उत्पन्न मिळू शकते. परंतु त्याचे काम रखडले आहे. परिणामी रिलायन्स, आयडिया-व्होडाफोन, एअरटेल आदी मोबाईल कंपन्यांनी स्वतःचे डक्‍ट टाकण्यासाठी महापालिकेकडे परवानगी मागितली. परंतु त्या बाबतही धोरण निश्‍चित नाही.

स्मार्ट सिटीलाही प्रतिसाद नाही ! 
स्मार्ट सिटी कंपनीनेही केबल डक्‍ट तयार करून द्यावा, अशी मागणी महापालिकेकडे केली. त्यासाठी  ५० कोटी देण्याचीही तयारी दर्शविली आहे. परंतु महापालिकेने प्रतिसाद दिलेला नाही. ‘फाइव्ह जी’ पुण्यात अल्पावधीमध्ये येणार आहे. ती नागरिकांनाही हवी आहे. परंतु ती देण्यासाठी डक्‍टच नाहीत. त्यामुळे महापालिकेने ते स्वतः उभारावेत किंवा आम्हाला उभारायची परवानगी द्यावी,’ अशी मागणी मोबाईल कंपन्यांनी महापालिकेकडे केली आहे.

तांत्रिक अडचणींचा पाढा
या बाबत महापालिकेच्या संबंधित विभागाकडे विचारणा केली असता, डक्‍टची निविदा मंजूर झाली असली, तरी त्यानुसार काम करणे करणे शक्‍य नाही, असे सांगण्यात आले. त्यात अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

यासाठी हवेत डक्‍ट 
ई- गर्व्हनन्स, ई- कॉमर्स, वाय-फाय, सीसीटीव्हीचे कॅमेरे, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, इंटलिजन्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम, स्मार्ट पोलसाठी इंटरनेटची सेवा अत्यावश्‍यक आहे. त्यासाठी ऑप्टिकल फायबरचे जाळे आवश्‍यक आहे. त्यासाठी मोबाईल कंपन्यांना शहरात खोदाईची परवानगी हवी आहे. पुण्यातील उपनगरांमधून तशी मागणीही वाढू लागली आहे. महापालिकेने केबल जाळे निर्माण व्हावे, म्हणून केबल डक्‍टचे कंत्राटही दिले. परंतु एकही नवा डक्‍ट निर्माण झालेला नाही.

उपनगरांत हवेत डक्‍ट
शहरात काही भागात मोबाईल कंपन्यांचे डक्‍ट आहेत. परंतु शहराचा विस्तार वाढत आहे. त्यानुसार त्यांना विशेषतः उपनगरांत केबलचे जाळे वाढवायचे आहेत. परंतु त्यासाठी डक्‍टच नाहीत. त्यामुळे फाइव्ह जीच्या सुविधेपासून पुणेकर दूर राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. औंध, बाणेर, बालेवाडी या स्मार्ट सिटीच्या भागात नव्या रस्त्यांवर डक्‍ट आहेत. परंतु पुण्यातील नव्या रस्त्यांवर मात्र ते नाहीत.   

Web Title: Punekar in the smart city is likely to be far from a digital network
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya today : मनातील भावना जोडीदाराला शेअर कराल; तुमची रास यात आहे का?

Horoscope Today : भाग्य फळफळणारा आजचा दिवस, मामाच्या संमिश्र गोष्टी कानावर येतील; तुमच्या नशिबात काय लिहिलंय? वाचा

Dombivli Politics : मंत्र्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच विरोधात बॅनरबाजी, प्रकरण थेट पोलिसांत पोहोचलं

Mumbai Crime : पार्किंगवरून भांडण, महिलेकडून विनयभंगाच्या गुन्ह्याची धमकी; भीतीपोटी वृद्धाने संपवले आयुष्य

Special Story: हमास, हिजबोल्ला एकवटले, इस्त्राईलला घेरले; मोसाद विरूद्ध मुस्लिम संघर्षाची इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT