बातम्या

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मिळणार विविध शिष्यवृत्ती.

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : पुढील पाच वर्षांमध्ये अल्पसंख्याक समाजातील पाच कोटी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारतर्फे विविध शिष्यवृत्ती देणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आज केली. या पाच कोटी विद्यार्थ्यांमधील 50 टक्के मुली असतील, असेही ते म्हणाले.

येथील "अंत्योदय भवना'त आयोजित केलेल्या मौलाना आझाद एज्युकेशन फौंडेशनच्या सर्वसाधारण बैठकीत नक्वी बोलत होते. "जातिवादाचे विष आणि लांगुलचालनाचे राजकारण दूर सारत मोदी सरकारने सर्वसमावेशक विकासासाठी योग्य वातावरण तयार केले आहे. आम्ही "समावेशी विकास आणि सर्वस्पर्शी विश्‍वास' निर्माण करण्यास कटिबद्ध आहोत. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना, विशेषत: मुलींना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या सबल करण्यासाठी शिक्षण, रोजगार आणि सबलीकरण यांची आवश्‍यकता असल्याचे सरकारचे मानणे असून, यासाठी दहावी आधी, दहावी नंतर आणि गरीब गुणवानांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे,' असे नक्वी म्हणाले.

देशाच्या दुर्गम भागातील सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी पंतप्रधान जनविकास कार्यक्रमाअंतर्गत शाळा, महाविद्यालये, निवासी व्यवस्था उभारली जात असल्याचेही त्यांनी सांगितले. देशभरातील मदरसांमधील शिक्षकांनाही हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि संगणकाचे प्रशिक्षण दिले जात असून, त्याद्वारे मदरशांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रचलित शिक्षण देता येईल, असे नक्वी यांनी सांगितले. 


Web Title: Modi Government provide scholarship to students of minority community

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT