बातम्या

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! सोनं 44,800 वर...

सकाळ वृत्तसेवा

सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झालीय. सोनं 44 हजार 700 रुपये प्रती तोळा इतकं झालंय. तर चांदी 2 हजार रुपयांनी वाढून आता 42 हजार 300 रुपये प्रती किलोवर पोहोचली.. कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर औद्योगिक मागणी घटत असल्याने   सोने-चांदीचे भाव कमी होत गेले होते. दुसरीकडे कोरोनामुळे मुंबईतील दुकाने बंद असल्याने सोने-चांदीची आवक थांबलीय. ही स्थिती सोन्यासाठी अनुकूल बनली आहे. यामुळे सोन्याचे भाव वाढत चाललेत. हे दर वाढून आता 24 कॅरट सोन्याचा दर तब्बल 44 हजार 700 रुपयांवर पोहोचलाय. 

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. त्यामुळे भारतासह अनेक देशांतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. मात्र, आता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढ झाल्याने आता सोने प्रतितोळा 45,724 रुपयांवर गेले आहे. तर चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. चांदीचे दर प्रतिकिलो ४३,३४५ पर्यंत गेले आहेत.

लॉकडाऊनमुळे व्यवहार ठप्प

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर यावर लगाम लावता यावा, यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात आहे. भारतातही कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे सध्या सर्वच व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. त्यानंतर आता सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. 

सणासुदीतही व्यवहार नाहीच

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी-विक्री केली जाते. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प झाल्याने ऐन सणासुदीतही सोन्याची खरेदी-विक्री झाली नाही. 

सोने-चांदीच्या दरात वाढ झाली असली तरीदेखील प्रत्यक्ष खरेदी-विक्री कधी होणार हे सांगणे कठीण झाले आहे. त्यामुळे सोने-चांदीच्या व्यवहाराला अद्यापही विलंबच लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SUV Cars in India: जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन, 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत येतात या SUV

Porsche New Car: व्हॉईस कमांड, 6 एअरबॅग्ज आणि 270kmpl स्पीड; पोर्शची डॅशिंग कार भारतात लॉन्च

Mumbai News : जेव्हीएलआर मार्गावरील वाहतुकीत ३१ मे पर्यंत बदल, नेमकं काय आहे कारण?

LSG vs KKR : कोलकाताकडून लखनऊचा दारूण पराभव, पॉइंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर

SCROLL FOR NEXT