leoprad shirdi news
leoprad shirdi news 
बातम्या

शिर्डीमध्ये शेतात पाणी भरत असताना बिबट्याचा शेतकऱ्यावर हल्ला.... 

साम टीव्ही ब्युरो

अहमदनगर : रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरत असताना शेतकऱ्यावर बिबट्याने Leopard हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला असून जखमी शेतकऱ्याला अहमदनगर Ahmednagar येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. Leopard attacks farmer in Shirdi

अहमदनगरच्या श्रीरामपूर Shrirampur तालुक्यातील बेलापूर खुर्द येथे पंढरीनाथ महाडिक वय ५७ हे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरत होते. अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यानंतर त्यांनी आरडा ओरडा केल्यानंतर परिसरातील शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. 

हे देखील पहा -

त्याठिकाणी नरभक्षक बिबट्याचा थरार बेलापूर खुर्द Belapur Khurd भागातील नागरिकांना पाहायला मिळाला आहे. रात्रीच्या वेळी शेतामध्ये पाणी भरत असताना शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला, असून जखमी शेतकऱ्याला अहमदनगर येथे उपचारासाठी दुसऱ्यादिवशी सकाळी दाखल करण्यात आले आहे. Leopard attacks farmer in Shirdi

जखमी शेतकऱ्याला तातडीने घरी आणले. कोरोनाच्या Corona पार्श्वभूमीवर डॉक्टर कोण उठणार नाही. यामुळे संपूर्ण रात्र त्यांनी घरीच काढली,  नंतर सकाळी उठून बेलापूर येथे प्राथमिक उपचार घेण्यासाठी अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बेलापूर परिसरामध्ये याआधी अनेक शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी परिसरातील शेतकरी करत आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya In Marathi 2024 : या ४ राशींवर बरसेल लक्ष्मीची कृपा, आरोग्याची काळजी घ्या

Today's Marathi News Live : नांदेडचा पारा पुन्हा वाढला, 41.02 कमाल तापमानाची नोंद

Bajaj ची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर येतेय! जबरदस्त फीचर्ससह किती मिळेल रेंज, जाणून घ्या

Kotak Mahindra Bank : कोटक महिंद्रा बँकेचे 'बुरे दिन' सुरु; दोन दिवसांत 47000 कोटी रुपयांचं नुकसान, १३ टक्क्यांनी शेअरची घसरण

Actress: 'तुम हुस्न परी' उर्मिलाच्या सौंदर्याने चाहते घायाळ

SCROLL FOR NEXT