ajit pawar 
बातम्या

खुशखबर! कोकणातील शेतकऱ्यांचे ३ लाख रुपयापर्यंतच्या कर्जावरील व्याज होणार माफ

पुण्याहून अमोल कविटकरसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही.

कोकणात चक्रीवादळाने मोठे नुकसान झाले. फळबागा उध्वस्त झाल्या आम्हाला इथल्या शेतकऱ्यांना पुन्हा उभं करायचं आहे.  कोकणातील शेतकरी फार पीककर्ज घेत नाही.  आता 3 लाखांपर्यंतचे पीककर्जावरील व्याज माफ असेल. व्याज शेतकऱ्याला भरावे लागणार नाही तर ते सरकार भरेल.  देशातली अशा प्रकारची ही पहिलीच योजना असुन शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा. फळबाग क्षेत्राकडे वळावे असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार (Ajit Pawar) यांनी श्रीवर्धन दौऱ्यादरम्यान केले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र, केरळ, गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यांना तोक्ते चक्रीवादळाचा (Tauktae Cyclone) फटका बसला होता. त्यामध्ये किनारपट्टीवरील आंबा व्यावसायिक, किंवा तेथील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आंबा व्यावसायिकांचे जवळपास १०० कोटींचे नुकसान झाले होते. यानंतर, विरोधी पक्षनेते त्याचबरोबर ठाकरे सरकारमधील नेत्यांनी जाऊन भेटी दिल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकण दौऱ्यानंतर शेतकऱ्यांना आणि तेथील नागरिकांना मदतीचे आश्वासन दिले होते. 

हे देखील पाहा

कोकणात चक्रीवादळाने काढणीला आलेल्या आंबांच्या बागा उध्वस्त झाल्या होत्या. अनेक ठिकाणी घराचे छप्पर उडून गेले, मोठ मोठी झाले उखडून पडली  होती. या चक्रीवादळाचा मच्छिमारांना देखील फटका बसला होता. त्यामुळे अजित पवारांनी केलेल्या या योजनेचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.   

Edited By : Pravin Dhamale

ताज्या बातम्यासाठी भेट द्या
Website - https://www.saamtv.com/
Twitter - https://twitter.com/saamTVnews
Facebook- https://www.facebook.com/SaamTV
ताज्या व्हिडिओंसाठी पहा
युट्यूब - https://www.youtube.com/channel/UC6cxTsUnfSZrj96KNHhRTHQ
टेलिग्राम - https://t.me/SaamNews


 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: वाणीवर लक्ष द्या, पैशाचं टेन्शन कमी होईल; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Arvind Kejriwal : आमचं सरकार आलं तर ५ दिवसांत E20 पेट्रोलवर बंदी; केजरीवाल यांची मोठी घोषणा

CJP New Team: कॉक्रोच जनता पार्टीमध्ये मोठा फेरबदल, नवीन सदस्यांची नियुक्ती, कुणाला मिळाली संधी?

Mysterious Fort : रहस्यांनी भरलेला प्राचीन किल्ला, 'या' गोष्टी तुम्हाला आश्चर्यचकित करतील

SCROLL FOR NEXT