बैतुल खामगाव राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात Saam T
बातम्या

बैतुल खामगाव राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा अपघात

अपघातात अंजनगाव येथील दोघे ठार

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमरावती - जिल्ह्यातील महाराष्ट्र Maharashtra मध्यप्रदेशच्या सीमेला लागून जाणारा बैतुल खामगाव Khamgaon राष्ट्रीय महामार्गावरील पांढरी जवळील वळण रस्त्यावर आज दुपारी दोनच्या सुमारास ट्रक आणि चारचाकीच्या समोरासमोर झालेल्या अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अंजनगाव येथील ओषधी व्यावसायिक प्रमोद निपाणी आणि त्यांच्या सहकारी अंगनवाडी सेवीका ललिता चव्हाण या कामानिमित्त परतवाडाला येत असतांना हा अपघात घडला.

हे देखील पहा -

तर विरूद्ध दिशेने मध्यप्रदेशच्या ग्वालियर येथून येणाऱ्या ट्रकने भरधाव येऊन निपाणे यांच्या गाडीला जोरदार धडक दीली. ही धडक इतकी जोरदार होती की वाहन अक्षरशः ट्रकखाली चिरडले गेले. यामध्ये निपाणी आणि चव्हाण या दोघांचाही मृत्यू झाला आहे. अपघात होताच काहींनी अपघातग्रस्तांना रुग्णालयापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न सार्थक ठरला नाही रुग्णालयात नेत असताना या दोघांचाही मृत्यू झाला.

अपघातानंतर घटनास्थळावरून ट्रकचालक Truck Driver पसार झाला असून पोलीस Police त्याचा शोध घेत आहे. पोलिसांनी याप्रसंगी घटनास्थळाचा पंचनामा करत क्रेनद्वारे सदर कार आणि ट्रक बाजूला केली. या मार्गावर मागील दोन आठवड्यांपूर्वी असाच अपघात झाल्याने एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता परिसरातील नागरिकांनी या मार्गावर गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. अपघाताचा तपास अंजनगाव पोलीस करत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये सव्वाचार कोटींचं चरस जप्त; पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

ठाण्यात अपघाताचा थरार; टेस्ट ड्राइव्हदरम्यान ताबा सुटला, कार थेट ४० फूट खड्ड्यात कोसळली

मोठं कुटुंब, मोठा पगार? 8व्या वेतन आयोगात मिळणार दुप्पट वेतन?

Pune Crime: स्कुटर थांबवली, धक्का देऊन खाली पाडलं अन्...! दिवसाढवळ्या व्यापाऱ्याचं अपहरण, पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

Jeera Rice Recipe : कुकरच्या २ शिट्ट्या अन् हॉटेलसारखा मोकळा जीरा राइस तयार, 'हा' सीक्रेट पदार्थ टाका रेसिपीत

SCROLL FOR NEXT