ST Strike: संपामुळे जालना महामंडळाला पावणे दोन कोटींचा फटका; कर्मचारी संपावर ठाम लक्ष्मण सोळुंके
बातम्या

ST Strike: संपामुळे जालना महामंडळाला पावणे दोन कोटींचा फटका; कर्मचारी संपावर ठाम

ST Strike: एसटी महामंडळाच्या जालना विभागाला गेल्या सात दिवसांत तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

लक्ष्मण सोळुंखे, साम टीव्ही जालना

जालना: एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरणाचा मुद्दा अत्ता महामंडळाला तोट्यात टाकणारा ठरतोय. विलीनीकरणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या चारही आगारातील तब्बल १२३० कर्मचाऱ्यांनी गेल्या सात दिवसांपासून संपाचे हत्यार उपसले आहे, त्यामुळे चार आगारातील जवळपास २२० बस उभ्या असल्याने महामंडळाला बसच्या जवळपास ३६० फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. परिणामी महामंडळाच्या जालना विभागाला गेल्या सात दिवसांत तब्बल १ कोटी ८४ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असल्याची माहिती जालना विभागीय कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

हे देखील पहा -

दरम्यान संप सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत १२३० कर्मचाऱ्यांपैकी २९ कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आल्याने संपकरी कर्मचारी मागे हटायला तयार नाहीत. आगारातून एकही बस बाहेर पडली नसल्याने वर्क शॉप कर्मचाऱ्यांनीही या संपात उडी घेतल्याने बस दुरुस्तीचे कामही गेल्या चार दिवसांपासून थांबलं आहे. संपात सहभागी झालेले कर्मचारी कामावर रुजू होण्यास तयार नसल्याने चारही आगारातील जवळपास ३६० फेऱ्या रद्द कराव्या लागल्याने महामंळाला दरोज सुमारे २५ ते २६ लाखाचे नुकसान होत असल्याने मागील सात दिवसांत महामंडळाच्या जालना विभागाला पावणे दोन कोटींचा फटका बसला आहे.

प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याच्या सूचना केल्या जात आहेत, मात्र कर्मचारी विलिनीकरणाच्या मुद्यावरून संपाचा भूमिकेवर ठाम असल्याने, संपाचे आंदोलन आणखीच चिघळवे आहे. गेल्या सात दिवसापासून जिल्ह्यातील रस्त्यावर लालपरी धावत झाल्याने सर्वसामान्य प्रवाशांचे मात्र हाल झाले आहेत.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart-Tea : चहाप्रेमींसाठी धोक्याची घंटा! चहा प्यायल्यानंतर हृदयाची धडधड वाढते? दुर्लक्ष करणे पडेल महागात

Maharashtra News Live Update: SIR विरोधात सोलापुरात युवा महासंघाचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

Salman Khan: बॉलिवूडचा भाईजान आता यूट्यूबवर! सलमान खानने सुरू केलं यूट्यूब चॅनेल, चाहत्यांसोबत शेअर केला पहिला खास व्हिडीओ

Paneer Crispy: चायनिज खाण्याची इच्छा झाली? मग घरीच बनवा कुरकुरीत आणि चटपटीत पनीर क्रिस्पी, वाचा रेसिपी

अभिजीत दिपकेंचा अटकेनंतर नवा व्हिडिओ समोर; CJP आंदोलनाबाबत केली मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT