Yavatmal News Saam tv
ऍग्रो वन

Cotton Price : कापसाला १२ हजार प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी; शेताच्या बांधावर कापूस जाळून आंदोलन

Yavatmal News : नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशात यवतमाळ तालुक्यातील बोथबोडण येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करीत कापसाला आणि सोयाबीनला भाव द्यावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

Rajesh Sonwane

संजय राठोड
यवतमाळ
: कापूस वेचणीचा हंगाम आटोपण्यात आला आहे. तरी देखील यंदा कापसाच्या दरात वाढ झालेली नाही. भाव वाढीच्या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवला आहे. दरम्यान कापसाला प्रति क्विंटल १२ हजार रुपये इतका दर मिळावा; अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. यातच यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आक्रमक झाले असून शेताच्या बांधावर कापूस जाळून आंदोलन करण्यात आले आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन पिकाला भाव नसल्याने शेतकऱ्याने शेताच्या बांधावर कापूस फेकून कापूस जाळत सरकारचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे. सध्या नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशात यवतमाळ तालुक्यातील बोथबोडण येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन करीत कापसाला आणि सोयाबीनला भाव द्यावा. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी शेतकऱ्यांनी दिला आहे.

१२ हजार भाव देण्याची मागणी 

दरम्यान कापसाचे भाव वाढत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. सरकारकडून भाववाढीची अपेक्षा असल्याने अजून कापूस विक्री करत नाही. दरम्यान कापसाला यंदा सुरवातीपासूनच सहा ते साडेसहा हजार प्रतिक्विंटल इतका दरच मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च देखील निघणे कठीण आहे. परिणामी कापसाला किमान १० ते १२ हजार रुपये इतका दर मिळावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. 

दर घसरले; शेतकऱ्यांची चिंता वाढली
वाशीम
: वाशिम जिल्ह्यात कपाशीच्या वेचणीचा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मात्र, बाजारात अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आर्थिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना कापूस विक्री करावी लागत असल्याने बाजारात कापसाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मंगरुळपीर येथील एका खासगी जिनिंग आणि प्रेसिंगसमोर कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. कापसाच्या दरात सतत होणारी घसरण पाहता अनेक शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र आर्थिक अडचणींमुळे त्यांनी तातडीने विक्रीला प्राधान्य दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: ५ दिवसांत कॅन्सर गायब करणारा डोस? एकाच डोसने गाठी पूर्णपणे नष्ट?

Wednesday Horoscope : चुका टाळाव्यात, सरकारी कामे रखडतील; ५ राशींच्या लोकांचे वाढू शकते संकट

Maharashtra Politics: ठाकरे-पवारांच्या मदतीला फडणवीस, ऑपरेशन टायगरला फडणवीसांचा चाप?

FORM 16: १ एप्रिलपासून कर्मचाऱ्यांसाठी मोठा बदल, फॉर्म 16 ऐवजी आता भरा फॉर्म 130

Ashok Kharat Case : नाशिकच्या भोंदूच्या दरबारी राजकीय नेत्यांची हजेरी; अशोक खरातचे 40 भक्त कोण?

SCROLL FOR NEXT