Yavatmal News Saam tv
ऍग्रो वन

Beed Attack : शेतात पाहणी करत असताना मधमाशांचा हल्ला; शेतकऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Rajesh Sonwane

संजय राठोड

यवतमाळ : शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर मधमाशांनी हल्ला केला. मधमाशांच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी काही साधन नसल्याने शेतकरी गंभीर जखमी झाला. दरम्यान जखमी शेतकऱ्याचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

यवतमाळच्या (Yavatmal News) नेर तालुक्यातील खरडगाव येथे हि घटना घडली आहे. निलेश अंबादास ठवळी असे या मृत शेतकऱ्यांचे नाव आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी निलेश ठवळी हे गेले होते. दरम्यान आपल्या शेतात लागवड केलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी करत होता, त्यावेळी शेतातील झाडावर बसलेला मधमाशांनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मधमाशानी अचानक हल्ला केल्याने शेतकऱ्याजवळ (farmer) बचाव करण्यासाठी काहीच साधन नव्हते.  

दरम्यान मधमाश्यांच्या हल्ल्यात सदर शेतकरी गंभीर जखमी झाले होते. यानंतर त्याला तातडीने कारंजा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरु असताना ऱ्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांनी आक्रोश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पूजा खेडकरने केली राज्याच्या मुख्य सचिवांकडे तक्रार

Sarfaraz Khan : टीम इंडियात चान्स हुकला, पण खचला नाही! सरफराजनं ठोकलं द्विशतक, 52 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

VIDEO : 'सावरकरांबाबत संकुचित विचारसारणी हे मोठं आव्हान', सुशीलकुमार शिंदेंकडून सावरकरांचं कौतुक

Maharastra Politics : निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करणार? मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय ठरलं? VIDEO

Bhokardan Vidhan Sabha : मविआत रस्सीखेच; शिवसेना ठाकरे गटाने ठोकला दावा

SCROLL FOR NEXT