Unseasonal Rain Saam tv
ऍग्रो वन

Unseasonal Rain : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; मंगरूळपीर व कारंजा तालुक्यात पिकांचे नुकसान

Washim News : राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला होता. यात काही भागात गारपीट देखील झाली होती.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार आज दुपारपासून (Washim) वाशिम जिल्ह्यात ढगाळ वातावरण असताना मंगरूळपीर व कारंजा तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस (Rain) झाला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. (Breaking Marathi News)

राज्यात फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाला होता. यात काही भागात गारपीट देखील झाली होती. (Farmer) यामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यानंतर आता देखील अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार वाशीम जिल्ह्यातील मंगरुळपीर व कारंजा तालुक्यात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तर सकाळपासूनच जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. मागील दहा ते पंधरा दिवसापासून उकाड्यांने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संत्रा बाग, हरभऱ्याचे नुकसान 

वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आल्यामुळे पुन्हा संत्रा बागेचे नुकसान होणार आहे. तर काही ठिकाणी कापून ठेवलेल्या हरभरा व काढणीला आलेल्या गव्हाच्या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT