Agriculture News Saam tv
ऍग्रो वन

Agriculture News : शेतकऱ्यांचा वेगळा प्रयोग; टरबुजाच्या पिकात केली केळीची लागवड

Washim News : साधारण अडीच- तीन महिन्याचे पीक असल्याने त्यानंतर लागवड करण्यापेक्षा टरबूज पिकातच दुसरे पीक घेण्याचा प्रयोग शेतकऱ्याने केला आहे यातूनच शेतकऱ्यांनी टरबूज फळपिकाची डिसेंबरमध्ये लागवड

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: पारंपरिक शेतीला फाटा देत काही शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करत असतात. त्यानुसार वाशिमच्या धावंडा येथील शेतकऱ्यानी टरबुजाचे पीक घेत असताना आधुनिकतेची जोड देत मल्चींगवर केळीची लागवड केली आहे. खर्चात बचत होईल त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी टरबुजाच्या पिकात केळीची लागवड करून उत्पन्न वाढीच्या दृष्टीने वेगळा प्रयोग केला आहे.

टरबुजाला उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात मागणी असते. त्यामुळे येथील शेतकरी मागील तीन वर्षापासून टरबूज या फळपिकाची शेती करीत आहेत. साधारण अडीच- तीन महिन्याचे पीक असल्याने त्यानंतर लागवड करण्यापेक्षा टरबूज पिकातच दुसरे पीक घेण्याचा प्रयोग शेतकऱ्याने केला आहे. यातूनच धावंडा येथील शेतकऱ्यांनी टरबूज फळपिकाची डिसेंबरमध्ये लागवड केली.  

एकाच खर्चात दोन पिकांचे व्यवस्थापन 

टरबूज लागवड केलेल्या रानात केळीची टिशू कल्चरची रोपे ठराविक अंतरावर टरबुजासाठी आच्छादलेल्या मल्चिंग वरंब्यावर लावली आहेत. प्रत्येक शेतकऱ्यांना साधारणतः एकरी ५० हजार रुपये पर्यंत खर्च येत असून एकाच खर्चात दोन पिकाचे व्यवस्थापन होत आहे. यामुळे खर्चात बचत होत असून पीक वाढीसाठी लागणार वेळ देखील वाचत आहे. ब्रम्हा शेतशिवारात

बहरली उन्हाळी तूर
वाशिम तालुक्यातील ब्रम्हा शेतशिवारात उन्हाळी तूर बहरली आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक हंगामी पिकांव्यतिरिक्त उन्हाळी तुरीची प्रयोगात्मक लागवड केली असून २ एकर क्षेत्रात घेतलेल्या या पिकाला चांगले यश मिळताना दिसत आहे. सध्या तुरीला फुलोरा लागण्यास सुरुवात झाली आहे. योग्य पद्धतीने सिंचन आणि खत व्यवस्थापन केल्यास उन्हाळी तूर शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते, असे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. तुरीचे दरही सध्या समाधानकारक असून हंगामात योग्य उत्पादन मिळाल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलची बचत करा, सोनं खरेदी करू नका; मोदींच्या आवाहनावर महाराष्ट्राचा कौल काय? मुंबई-पुण्यासह, नागपूरकरांची भूमिका स्पष्ट

Shani Jayanti 2026: शनी जयंतीला होणार बुध-शुक्राचं गोचर; या राशींना मिळणार पैसाच पैसा

Maharashtra News Live Update: जमिनीचे तुकडे मंजुरीशिवाय विकता येणार नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय

मुलीच्या हळदीत वडिलाचं हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू; लग्न घरावर कोसळला दुःखाचा डोंगर

Work From Home Jobs For Women: महिलांसाठी वर्क फ्रॉम होम जॉब्स, घरबसल्या झटक्यात कमवा लाखो रूपये

SCROLL FOR NEXT