Crop Loan Saam tv
ऍग्रो वन

Crop Loan : वाशिम जिल्ह्यातील ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप

Washim News : खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशाची निकड भासू नये. यासाठी बँकांकडून पीककर्ज वाटप केले जाते.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : खरीप व रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना बँकांकडून पीककर्ज उपलब्ध करून दिले जात असते. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामासाठी कर्ज वाटपास सुरवात करण्यात आली असून वाशीम जिल्ह्यात आतापर्यंत ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे. 

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये वाशिम (Washim) जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशाची निकड भासू नये. यासाठी बँकांकडून पीककर्ज वाटप केले जाते. त्यानुसार १ एप्रिलपासून कर्ज वितरणाला प्रारंभ झाला आहे. महिनाभराच्या कालावधीत ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना (Farmer) कर्जवाटप करण्यात आले आहे. हे वाटप मागील महिनाभरात झाले आहे. 

खरीप हंगाम पेरणीपूर्वीच ७५ टक्के शेतकऱ्यांना कर्जवाटप (Crop Loan) करावे; अशा सूचना वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सर्व बँकांना दिल्या आहेत. १३ मेपर्यंत ५१ हजार ५८९ शेतकऱ्यांना ५०५ कोटी २९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. कर्ज वाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक आघाडीवर असून, खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कर्जवाटपात पिछाडीवर आहेत. सर्व बँकांनी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Shocking : प्रसिद्ध बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडल्या; 4 दिवसांवर होतं लेकीचं लग्न

Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार कुणी केला? संशयितांची नावं आली समोर; घटनेचा थरार सीसीटीव्हीत कैद

Ajit Pawar Death: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? नेमकं काय घडलं होतं? तपासातून सत्य येणार समोर

Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT