Washim Bajar Samiti Saam tv
ऍग्रो वन

Washim Bajar Samiti : आठवडाभरातच सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक; वाशिम जिल्ह्यातील बाजार समितीतील स्थिती

Washim News : दिवाळी संपल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असली, तरी शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर अधिक भर देत आहेत

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 
वाशीम
: शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या सोयाबीनची काढणी जवळपास पूर्ण झाली आहे. यामुळे काढलेला सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीमध्ये आणत आहेत. यामुळे दिवाळीनंतर अर्थात मागील आठवडाभरातच वाशीम जिल्ह्यातील बाजार समितींमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. 

दिवाळी संपल्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू असली, तरी शेतकरी सोयाबीनच्या विक्रीवर अधिक भर देत आहेत. त्यामुळे (Washim) वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक प्रचंड वाढली आहे. आता आठवडाभरातच जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये सव्वा लाख क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली आहे. शेतकरी (Farmer) सोयाबीन विक्री करत असला तरी सोयाबीनला अपेक्षित दर मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. 

वाशीम जिल्ह्यातील बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली असून त्यात एकट्या कारंजा बाजार समितीत (Bajar Samiti) गत गुरुवारपासून ४० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाल्याचे दिसून आले. तर वाशिम बाजार समितीतही आठवडाभरात ३० हजार क्विंटलपेक्षा अधिक सोयाबीनची आवक झाली होती. याबाजार समितीत गुरुवारला १० हजार ५०० क्विंटल सोयाबीनची आवक झाल्याचे बाजार समितीच्या लिलावातील आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sugar Free Modak: डायबिटीजची चिंता न करता खा मोदक; साखरेशिवाय बनवा झटपट आणि हेल्दी 'शुगर फ्री मोदक'

Maharashtra News Live Update: पुण्यातील मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीमच्या भव्य मिरवणूकीला सुरुवात

Diabetes and Panchamrit: डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी पंचामृत प्यावे की नाही? जाणून घ्या

Pune : प्रायव्हेट पार्टला हळद कुंकू लावलं,पतीचा मंगळदोष काढण्यासाठी अघोरी पूजा, पुण्यात भयंकर प्रकार

Latest Mangalsutra Designs: नऊवारी साडीवर उठून दिसतील अस्सल पारंपारिक मंगळसूत्र, 5 लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT