Washim News Saam tv
ऍग्रो वन

Washim News : ज्वारीचे फुटवे खाल्ल्याने ४० जनावरांना विषबाधा

Washim News : खरीप हंगामात ज्वारी पिकांची लागवड करण्यात आलेली असते. या ज्वारीचे उत्पादन घेतल्यानंतर यातूनच अनेक शेतकरी हे दूरीचे उत्पादन घेत असतात.

Rajesh Sonwane

मनोज जयस्वाल 

वाशिम : वाशिमच्या वाल्हई गावातील चाळीस जनावरे ज्वारीच्या कापणी झालेल्या शेतात चरण्याकरिता गेले (Washim) असता शेतामध्ये ज्वारीचे नवीन फुटवे खाण्यात आले. त्या फुटव्यामध्ये एचसीएन नावाचा विषारी पदार्थ असल्यामुळे त्यापासून वाल्हई गावातील जवळपास ४० जनावरांना विषबाधा झाल्याची घटना घडली. (Latest Marathi News)

खरीप हंगामात ज्वारी (Jowar) पिकांची लागवड करण्यात आलेली असते. या ज्वारीचे उत्पादन घेतल्यानंतर यातूनच अनेक शेतकरी (Farmer) हे दूरीचे उत्पादन घेत असतात. अर्थात खरीप हंगामातील ज्वारी कापलेल्या ठिकाणी नवीन फुटवे येतात. हे फुटवे लहान असताना त्यात एचसीएन हा विषारी पदार्थ असतो. जनावरांच्या हे खाण्यात आल्याने त्यांना त्रास होत असतो. विषबाधा होऊन पॉट फुगत असते. यात काही जनावरांचा मृत्यू देखील होत असतो. असाच प्रकार वाशीम जिल्ह्यातील वाल्हई या गावात घडला आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पशुसंवर्धन विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले व जनावरांना औषधोपचार केला. पशुसंवर्धन विभागाच्या शर्तीच्या प्रयत्नामुळे गावातील चाळीस जनावरांचे प्राण वाचले. पशुपालकांनी ज्वारीच्या नवीन फुटवे निघालेल्या शेतात आपले पशुधन चारावयास नेऊ नये; असे आवाहन पशु विकास अधिकारी डॉ. एम. एस. मेंढे यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

SCROLL FOR NEXT