Lumpy Skin Disease , wakhri , Khillar animals saam tv
ऍग्रो वन

Lumpy Skin Disease : काेराेनानंतर लम्पीचं संकट; कार्तिकी यात्रेतील खिलार जनावरांचा बाजार रद्द

राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रेदश, मध्यप्रदेश आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर जातिवंत खिलार जनावरे विक्रीसाठी येतात.

भारत नागणे

Lumpy Skin Disease : राज्यात (maharashtra) लम्पी स्किन आजाराचा (Lumpy Skin Disease) संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कार्तिकी यात्रेच्या (kartiki yatra) निमित्ताने वाखरी येथे भरणारा खिलार जनावरांचा बाजार रद्द करण्यात आला आहे आहे. (Maharashtra News)

कार्तिकी यात्रेच्या निमित्ताने वाखरी येथे दरवर्षी खिलार जनावरांबरोबर पंढरपुरी म्हशीचा मोठा बाजार भरतो. राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रेदश, मध्यप्रदेश आदी राज्यातून मोठ्या प्रमाणावर जातिवंत खिलार जनावरे विक्रीसाठी येतात.

खिलार जनावरांचा बाजार हे कार्तिकी यात्रेचे मुख्य आकर्षण असते. कोराेनामध्ये सलग दोन वर्षे जनावरांचा बाजार बंद होता. यंदा बाजार भरणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साह असतानाच लम्पी आजाराने थैमान घातले आहे. (Pandharpur Latest Marathi News)

लम्पी आजाराने हजारो जनावरांचा बळी घेतला आहे. लम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी जनावरांची वाहतूक करण्याबरोबरच बाजार भरवण्यावर प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. सोलापूर (solapur) जिल्ह्यात ही लंम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जनावरांमध्ये आलेला लंम्पीचा संसर्ग रोखण्यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने एक ते सात नोव्हेंबर कालावधीत कार्तिकी यात्रेमध्ये भरणारा जनावरांचा बाजार रद्द केला आहे. शेतक-याने (farmers) आपली जनावरे बाजारात विक्रीसाठी आणू नयेत असे आवाहन बाजार समितीचे अध्यक्ष दिलीप घाडगे यांनी केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ED Raids : ईडीची रिलायन्सवर मोठी कारवाई, अंबानींच्या विश्वासूला ठोकल्या बेड्या

Crime: मित्रासोबत जेवायला कॉलेजबाहेर गेली, वाटेत तिघांनी अडवलं अन् ओढत जंगलात नेलं, MBBS च्या विद्यार्थिनीवर बलात्कार

Karanji Recipe: करंजी तेलात सोडताच फुटते? या सोप्या ट्रिक्स वापरा अन् दिवाळीत तुमच्याच फराळाची चर्चा

Damini: दामिनी पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला...; 'ही' अभिनेत्री झळकणार नव्या दामिनीच्या रुपात

Kailasgad Fort History: पुणे जिल्ह्यातील कैलासगड किल्ल्याचा इतिहास माहितेय का? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT