Nandurbar News Saam Tv
ऍग्रो वन

दिवाळी काळात सर्वसामान्यांचा खिश्याला कात्री; भाजीपाल्याच्या दरात वाढ...

परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दिनू गावित, साम टीव्ही नंदूरबार

नंदुरबार - आधीच महागाईच्या भडक्यात होरपळून निघालेल्या सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशची परसबाग म्हणून नंदुरबार (Nanurbar) जिल्ह्याची ओळख आहे. जिल्ह्यातून गुजरात (Gujarat) आणि मध्य प्रदेश लाही मोठ्या प्रमाणात भाजीपाला पुरवठा केला जात असतो मात्र परतीच्या पावसामुळे भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याचाच परिणाम भाजीपाल्याच्या दारावर झाला आहे. (Nandurbar Latest News In Marathi)

नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महात्मा फुले भाजीपाला मार्केटमध्ये भाजीपाल्याचे आवक कमी झाली असून भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य माणसांना बसत आहे. भाजीपाल्याचे दर शंभरी गाठतात की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे. भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसत असून दिवाळी काळातच भाजीपालाच्या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांच्या खिसा खाली करणारा ठरत आहे.

भाजीपाला दर खालील प्रमाणे

शेवगा. - ८० रुपये प्रति किलो

कोथिंबीर- ६० रुपये प्रति किलो

गिलकी - ६० रुपये प्रति किलो

दोडकी- ६० रुपये प्रति किलो

वांगे :- ५० रुपये प्रति किलो

बटाटे - ४० रुपये प्रति किलो

टोमॅटो - ४० रुपये प्रति किलो

मिरची - ३० रुपये प्रति किलो

कोबी - ४० रुपये प्रति किलो

पत्ता कोबी - ४० रुपये प्रति किलो

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scam : राज्यपालांच्या PA च्या नावाने रेल्वेच्या VVIP तिकिटांचा घोटाळा! 'लोकभवन'च्या बनावट लेटरहेडचा वापर; ७ जणांना अटक

PF Transfer : जुनं PF खाते बंद झालं? EPFO च्या नव्या पोर्टलमुळे अडकलेले पैसे, Active UAN मध्ये ट्रान्सफर करणं झाले जास्त सोपं

Maharashtra News Live Update:भिवंडी इमारत दुर्घटना; मुख्यमंत्री फडणवीसांची घटनास्थळी पाहणी, महापालिका आयुक्तांना तातडीच्या कारवाईचे आदेश

Lung cancer: तरूणांच्या शरीरात गपचूप घर करतो फु्फ्फुसांचा कॅन्सर; सुरुवातीची 5 लक्षणं वेळीच ओळखा

Vaidehi Parshurami: जांभळी साडी, नाकात नथ अन् कपाळावर चंद्रकोर; वैदेही परशुरामीचा मराठमोळा अंदाज

SCROLL FOR NEXT