भंडाऱ्यात पशु चिकित्सा संघटनेच्या आंदोलनामुळे जनावरांचे लसीकरण खोळंबले अभिजीत घोरमारे
ऍग्रो वन

भंडाऱ्यात पशु चिकित्सा संघटनेच्या आंदोलनामुळे जनावरांचे लसीकरण खोळंबले

भंडारा जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासुन पशु चिकित्सा संघटनेचे आंदोलन सुरु असल्याने तब्बल 4 लाख पाळीव जनावरांचे लसिकरण खोळंबले आहे. लसीकरणाअभावी जनावरांचा मृत्यू.

अभिजीत घोरमारे

भंडारा : भंडारा जिल्ह्यात तब्बल 4 लाख पाळीव जनावराचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या 2 महिन्यांपासून जिल्ह्यात पशु चिकित्सा संघटनेचे आंदोलन सुरु असल्याने तब्बल 4 लाख पाळीव जनावरांचे लसिकरण खोळंबले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाळीव प्राण्यांचे लसीकरण न झाल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असून आतापर्यंत जिल्हातील तब्बल 25 जनावरांचा व 1 घोड्याचा मृत्यु झाला आहे. (Vaccination of animals was delayed due to agitation of veterinary association in Bhandara)

जिल्ह्यात पर्यायाने राज्यात 15 जूनपासून पशु चिकित्सा संघटनेचे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सूरु झाले आहे. त्यामुळे मागील 2 महिन्यांपासुन जिल्ह्यात एकही पशु वैद्यकीय अधिकारी जनावरांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आले नाही. इतकेच काय प्रत्येक वर्षाच्या 6 महिन्यांत लागनारी घटसर्प, एक टयांग्या, आंत्रविषार इत्यादी रोगाची लस त्यांना अद्यापही लागली नाही. ही लस केवळ यांनाच नाही तर भंडारा जिल्ह्यातील तब्बल 3 लाख 82 हजार पशुंना लस देण्यात आली नाही.

हे देखील पहा -

सध्या जनावरांच्या आरोग्यची तपासणी न झाल्याणे जिल्ह्यातील तब्बल 20 ते 25 जनावरे दगावले असून चिचाळ येथील तब्बल 3 लाखाच्या घोडा उपचाराविना दगावला आहे. जनावरांची ही स्थिती बघून शेतकरी चिंतेत पडले आहेत. पशुपालन आमचा जोडधंदा असल्याने आमचा त्रास लक्षात घेऊन लवकर लसीकरण करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहे. तर शासन जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत प्रशासनाला असहकार असल्याचे पशु चिकित्सा संघनेचे पदाधिकारी सांगतात. शासनच ह्याला जबाबदार असल्याचे आंदोलनकारी कर्मचारी सांगत आहे.

राज्यात शासन आणि संघटना यांच्या वादात मुक्या जनावरांचे मात्र हाल होत आहेत. जनावरांनी चारा पाणी खाणे सोडले आहे. आता तर चक्क जनावरांवर साथिचे रोग प्रभाव करीत आहे. त्यामुळे शासनाने वेळीच लक्ष घालून लसीकरणाची पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे, जेणे करून ह्या मुक्या जनावरांचा बळी जाण्यापासून त्यांना वाचवता यईल.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

3–4 Gram Gold Mangalsutra Design: 3 - 4 ग्रॅममध्ये बनवा सुंदर आणि शाही सोन्याचे मंगळसूत्र; महिलांसाठी 5 ट्रेंडी डिझाईन्स

Garba Bindi Designs : गरब्यात सगळ्यांची नजर फक्त तुमच्यावरच! ट्राय करा 'या' ७ ट्रेंडी बिंदी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: पुण्यात स्कूलबसच्या धडकेत मुलगा मृत्युमुखी,घोरपडी परिसरातील घटना

Heart Attack Symptoms: हार्ट अटॅकआधी शरीर देतं हे ७ संकेत, जाणून घ्या

Gold Rate Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी सोनं झालं स्वस्त, १० तोळा ३३०० रुपयांनी घसरले; वाचा 18k- 22k आणि 18k चे दर

SCROLL FOR NEXT