Maval News दिलीप कांबळे
ऍग्रो वन

Maval: धामणे गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून ऊस पाचट व्यवस्थापनावर प्रशिक्षण

यावेळी कृषी संचालक राजेंद्र साबळे पूनम खटावकर यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे.

दिलीप कांबळे

मावळ - मधील धामणे गावात महाराष्ट्र शासन कृषी विभाग (Department of Agriculture) व कृषी तंत्रज्ञान यांच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना (Farmer) ऊस (Sugarcane) पिकामध्ये सेंद्रिय खतांचा (Organic Fertilizers) वापर वाढवण्यासाठी ऊस पाचट व्यवस्थापन अंतर्गत ऊस पाचट कुजवणे आणि सेंद्रिय पद्धतीने खत निर्मिती या विषयावर प्रात्यक्षिक शिबिर घेण्यात आले. यावेळी कृषी संचालक राजेंद्र साबळे पूनम खटावकर यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षण शिबिराला शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. (Training on sugarcane cultivation to the farmers)

हे देखील पहा -

कृषी विभागातर्फे मावळत तालुक्यात पहिल्यांदाच हा उपक्रम राबविण्यात आला होता. सेंद्रिय खत कशा पद्धतीने तयार करावं आणि आपल्या पिकांना कशा पद्धतीने या खताचा डोस द्यावा याचं सर्व प्रशिक्षण या शिबिरामध्ये देण्यात आला. दरम्यान, या शिबिरात भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना दोन हजार रुपये प्रति एकर याप्रमाणे अनुदानही देण्यात येणार आहे असे मत प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे यांनी व्यक्त केले.

ऊस पाचट कुजवणे बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. जमिनीची सुपीकता वाढविण्यात व ऊस खोडव्याचे उत्पादन वाढविण्यास मदत होते असे त्यांनी सांगितले. तर ऊस पाचट कुट्टी मशीन बद्दल ही माहिती शेतकऱ्यांना देण्यात आले आणि प्रात्यक्षिकही करून दाखवले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT