आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पदवीधर महिला करतेय टॅक्टरने शेती!  संजय राठोड
ऍग्रो वन

आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात पदवीधर महिला करतेय टॅक्टरने शेती!

आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या लोनबेहळ येथील आरती बुटले या स्वतः टॅक्टरने शेती कसून पतीला कामात हातभार लावण्याचे काम करत आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड

यवतमाळ : नारीशक्तीने सर्वच क्षेत्रात गगन भरारी घेत स्वतःचा नाव लौकिक वाढवल्याची अनेक उदाहरणे आहेत. आत्महत्याग्रस्त यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या लोनबेहळ (Lonbehal) येथील आरती बुटले या स्वतः टॅक्टरने (Tractor) शेती कसून पतीला कामात हातभार लावण्याचे काम करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चित्र पालटायला सुरूवात झाली आहे. आता ग्रामीण भागात सुद्धा पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करित आहेत. त्यातही अद्ययावत तंत्रज्ञान हाताळण्यासाठी पुढे येतायात.

हे देखील पहा -

महिला म्हणजे चूल अन् मुल पुरता मर्यादीत कार्यक्रम असाच काही समज आजपर्यंत पुरुषप्रधान भारतीय समाजात आपण अनुभवला आहे. मात्र, कालपरत्वे यात बदल होऊन स्त्री-पुरुष समानतेला वाव मिळताना दिसतोय. लोनबेहळ येथील शेतकरी (Farmer) कुटूंबातील पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या आरती उत्तम बुटले ह्या स्वतः गृहिणी आहेत. आपल्या पतीला मदत करण्यासाठी आरती बुटले पुढे आल्या आणि पंचवीस एकर शेतात ट्रॅक्टरच्या माध्यमातून नांगरणी, पेरणी आणि फवारणीची कामे त्या स्वतः करतात.

आरती बुटले यांनी ट्रॅक्टरने शेतीची कामे करत असल्याने महिला सक्षमीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण म्हणता येईल. यवतमाळ जिल्ह्यात लाखो शेतकऱ्यांनी सततच्या नापिकीला आणि कर्जाला कंटाळून जगाचा निरोप घेतला. त्यामुळे आरती बुटले यांनी जिल्ह्यातील शेतकरी विधवा महिलांसमोर एक नवा आदर्श ठेवलाय. महिला देखील आता मागे नाही, असाच काही मेसेज आरती बुटलेंनी ट्रॅक्टर चालवून दिलाय. पंचवीस एकर शेतीत हळद, कापूस, सोयाबीन आणि तूर या पिकांची लागवड आरती यांनी स्वतः केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अत्यल्प उत्पन्नामुळे खचलेल्या शेतकऱ्याने विष प्राशन करून जीवन संपवलं

Lips Care : ओठ सतत फाटून रक्त येतं? 'हा' सॉलिड उपाय करा, लिप्स होतील गुलाबी अन् एकदम सॉफ्ट

बोरिवली आरटीओ आणि मुंबई रायडर्स क्लबतर्फे रस्ता सुरक्षा अभियान, १०० मोटारसायकल रायडर्सचा सहभाग

Tukaram Mundhe : 'मी माझ्या मुलांना कधीच IAS होऊ देणार नाही!' तुकाराम मुंढे स्पष्टच बोलले अन् सांगितलं कारण

Peacock Green Colur Saree Design: महिलांसाठी मोरपंखी कलरच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, 5 पॅटर्न्स पाहून खूश व्हाल

SCROLL FOR NEXT