मुंबईतील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज' ही संस्था देशात सातव्या क्रमांकावर... Saam Tv
ऍग्रो वन

मुंबईतील 'सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज' ही संस्था देशात सातव्या क्रमांकावर...

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर 26 व्या क्रमांकावर भरारी घेतली आहे.

वृत्तसंस्था

संतोष शाळीग्राम, नवी दिल्ली

नवी दिल्ली: मुंबईतील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज (Central Institute of Fisheries Education) या संस्थेला राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्लीचे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन जाहीर झाले आहेत, यात‌ या संस्थेला सातवा क्रमांक मिळाला आहे. (The Central Institute of Fisheries in Mumbai is ranked seventh in the country)

हे देखील पहा -

देशातील 67 कृषी विज्ञान संस्थांचे मानांकन (Rank) जाहीर करण्यात आले आहे. अकोला (Akola) येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने राष्ट्रीय पातळीवर 26 व्या स्थानी भरारी घेतली आहे. नागपूर येथील महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापाठाने 36 वे, तर दापोलीतील कोकण कृषी विद्यापीठाला 42 वे स्थान मिळाले आहे. भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली अंतर्गत देशभरातील सर्वच कृषी विद्यापीठे कार्यरत असून, विद्यापीठांचा शैक्षणिक, संशोधनात्मक तथा विस्तार कामांचा वार्षिक आढावा दरवर्षी परिषदेच्या माध्यमातून घेण्यात येतो.

विद्यापीठांमधील उपलब्ध सोयी सुविधा, संशोधक, प्राध्यापक, विद्यार्थी वर्गांची शैक्षणिक व संशोधनात्मक कामगिरी तथा विद्यापीठाचा कृषी (Agriculture) तथा तत्सम विभागामार्फत कृषी विस्तार कार्यक्रमाचा लेखाजोखा या निमित्ताने दरवर्षी तपासला जातो. त्यानुसार त्यांची गुणवत्तेचे रँकिंग जाहीर केले जाते.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Best Bus Strike: अखेर तोडगा निघालाच! बेस्टचा संप मागे, कर्मचाऱ्यांना मिळणार २००० रुपये मासिक हंगामी वाढ

ओमराजे निंबाळकरांचं अखेर ठरलं! ठाकरेंच्या मनधरणीच्या प्रयत्नांना अपयश

मुलीला वाचवण्यासाठी बाप बिबट्याशी भिडला; मृत्यूच्या जबड्यातून चिमुकलीची सुटका

अमिताभ बच्चन यांची लेक संजय राऊतांची फॅन; खुद्द जया बच्चन यांचा खुलासा

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

SCROLL FOR NEXT