Aurangabad News Saam Tv
ऍग्रो वन

ऊस ताेडणीने शेतकऱ्यांत आनंदाेत्सव; डीजे, फटाक्यांच्या आतीषबाजीने शिवार दुमदुमले

कारखान्यांनी ऊस घेऊन गेल्यानंतर जग जिंकल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

माधव सावरगावे, साम टीव्ही, औरंगाबाद.

औरंगाबाद - मराठवाड्यात सध्या अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झाला आहे. आपला ऊस कारखान्याने लवकर न्यावा म्हणून शेतकरी (Farmer) आटापिटा करत आहेत. आजही हजारो शेतकऱ्यांचा ऊस शेतात तसाच उभा आहे. पावसाळ्याच्या तोंडावर त्या शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. तर दुसरीकडे ऊस कारखान्याने ऊस नेल्यानंतर शेतकऱ्याच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचं असं चित्र समोर आलं आहे.

हे देखील पाहा -

कारखान्यांनी ऊस घेऊन गेल्यानंतर जग जिंकल्याचा आनंद शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे. त्यामुळे पैठण तालुक्यातील चांगतपुरी इथं शेतकऱ्यांनी डीजे लावून फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. ऊस तोडणी साठी मजूर मिळत नसल्यामुळे आणि कारखाने तोडणीला माणसं पाठवत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाला होता, त्यातून सुटका करण्यासाठी चांगतपुरी येथील नवनाथ गीते यांच्या ऊसतोडणी यंत्राने 33 हजार टन एवढा विक्रमी ऊस तोडला.

या मशीनमुळे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊ शकला आणि शेतकरी अतिरिक्त उसाच्या संकटातून सुटले म्हणून अख्खा गाव डीजे लावून ऊसतोडणी मशीनसमोर आनंद साजरा केला. इतकंच नाही तर हंगाम संपताच चांगतपूरी ग्रामस्थांनी डिजे लावून गावातून मशीनची अशी जंगी मिरवणूक काढली. या आनंदावरूनच लक्षात येते की अतिरिक्त उसामुळे शेतकरी किती त्रास होते. आता असाच आनंद मराठवाड्यातल्या गावा गावातील शेतकऱ्यांना व्हावा इतकी अपेक्षा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News : मुंबई महापालिकेत खळबळ! दोन बड्या अधिकाऱ्यांचा मोठा गेम उघड, लाचखोरीचा गुन्हा

Pradeep Purnekar: ठाण्यात ठाकरेसेनेच्या विभाग प्रमुखावर कार्यालयातच गोळीबार; हत्येचा थरारक घटनाक्रम

रोहित शर्मा-शुभमन गिलचे तांडव! दोन्ही सलामीवीरांनी ठोकले वादळी शतक; विंडीजची पळता भुई थोडी

MPSC परीक्षार्थींसाठी सर्वात मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा;  ७ मोठे निर्णय

Kidney Failure Risk: तरूणांमध्ये किडनी फेलचा धोका का वाढतोय? ही लक्षणे दिसताच घ्या खबरदारी

SCROLL FOR NEXT