navi mumbai , apmc market, mango
navi mumbai , apmc market, mango saam tv
ऍग्रो वन

APMC Market Vashi : आंब्याच्या पेट्या दाखल, एपीएमसीत आनंदाचे वातावरण; जाणून घ्या दर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- सिद्धेश म्हात्रे

APMC Market : कोकणचा राजा म्हणून ओळख असणाऱ्या हापूस आंब्याचे (Hapus Amba) नुकतेच सांगली (Sangli) येथे आगमन झाले हाेते. सांगलीमधील बाजारात पहिल्या पेटीला चार हजार शंभर इतका उचांकी दर मिळाला. आता आंबा नवी मुंबईतील (Navi Mumbai) एपीएमसी (Agriculture Produce Market Committee) फळ (Fruit) बाजारात (Bazar) देखील दाखल झाला आहे.

एपीएमसी मार्केटमध्ये आज आंब्याची विक्रमी आवक झाली आहे. फेब्रुवारीत प्रथमच एकाच दिवशी 479 आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या आहेत. यंदा आंब्याचे चांगले उत्पादन झाले आहे. त्यामुळे मार्चमध्येच मुबलक आंबे येण्याची शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे.

दरम्यान चार ते सात डझनच्या पेटीला तीन हजार पाचशे रुपये ते आठ हजार रुपये असा भाव आंब्याला मिळत आहे. यंदा आंब्याची आवक वाढणार असल्याने एपीएमसी येथील आंबा व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : दादर रेल्वे स्थानकातील अमरावती एक्स्प्रेसला किरकोळ आग

Onion Export News: मोठी बातमी! कांद्यावरील निर्यात बंदी हटवली; निवडणुकीच्या धामधुमीत केंद्राचा मोठा निर्णय

Bacchu Kadu : देशात पक्षांचा राजकीय आतंकवाद वाढत चालला आहे : बच्चू कडू

Petrol Diesel Rate 4rd May 2024: वीकेंडला घराबाहेर पडताय? जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर

Mumbai News: कॉन्स्टेबल विशाल पवार मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण; पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती उघड

SCROLL FOR NEXT