soyabean price,  saam tv
ऍग्रो वन

Soyabean Price : साेयाबीन, कापसाचा दर घसरला; काँग्रेसचा आंदाेलनाचा इशारा

राज्य आणि केंद्र सरकारने याकडे लक्ष न दिल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करेल असा इशारा के.सी पाडवी यांनी दिला आहे.

साम न्यूज नेटवर्क

- सागर निकवाडे

Soyabean Price : नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनचे दर घसरले आहे. या बाजार समितीत साेयाबीनचा दर सहाशे रुपयांनी खाली आला आहे. आता साेयबीनला (soyabean) चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटलने विकले जात आहे. (Maharashtra News)

कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाचे दरही खाली आले आहेत. कापूस सात हजार पाचशे ते आठ हजार दोनशे प्रतिक्विंटलने विक्री होत आहे. त्यामुळे कापूस (cotton) आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणी सापडला आहे.

केंद्र आणि राज्यात असलेले सरकार हे व्यापाऱ्यांचे सरकार असून मागील वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन उपलब्ध असतानाही सरकारने मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे केलेली आयात. तसेच कापसाच्या संदर्भात घेतलेले काही चुकीचे निर्णय यामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी देशोधडीला लागत आहेत असा आरोप राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री केसी पाडवी यांनी केला आहे.

राज्य आणि केंद्र सरकारने याकडे लक्ष न दिल्यास आणि शेतकऱ्यांना (farmers) योग्य तो दर न दिल्यास येणाऱ्या काही दिवसात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी संघर्ष करेल असा इशारा के.सी पाडवी यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

Pune Crime: पुणे हादरले! नवऱ्यासोबत कडाक्याचे भांडण, महिलेने ८ व्या मजल्यावरून मारली उडी

Maharashtra Farmer Loan : कर्जमाफीचा मोठा निर्णय! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार; सहकार विभागाची सरकारला माहिती

SCROLL FOR NEXT