Solapur Bazar Samiti, Onion saam tv
ऍग्रो वन

Solapur Bazar Samiti : साेलापूर बाजार समितीत दाेन दिवस कांद्याचा लिलाव बंद; जाणून घ्या कारण

साेलापूर जिल्ह्यात कांद्याची आवक वाढली.

विश्वभूषण लिमये

Solapur Bazar Samiti : सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक माेठ्या प्रमाणात मंगळवारी वाढली. त्यामुळे बाजार समितीने आज (बुधवार) आणि उद्या (ता. 26) कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी कांद्याचे (onion) लिलाव पुर्ववत सुरु हाेतील अशी माहिती व्यापा-यांनी दिली.

सोलापूर (solapur) कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या दाेन दिवसांत सुमारे पंधराशे गाड्या कांद्याची आवक झाली. त्यामुळे मंगळवारी बाजार समितीच्या बाहेर वाहनांची माेठी रांग लागली हाेती. सोलापूरच्या बाजार समितीतील लिलाव दुपारी तीन वाजता सुरु झाले.

त्यापुर्वी व्यापारी, माथाडी कामगार आणि अडते यांच्या झालेल्या बैठकीत आगामी दाेन दिवस कांद्याचे लिलाव बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्यानूसार आज (बुधवार) आणि उद्या (गुरुवार, ता. 26) बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव बंद राहणार आहेत. (Maharashtra News)

कामगार तसेच माथाडी कामगार यांचा विचार करुन आज (बुधवार) कांद्याचा लिलाव बंद ठेवण्यात आला आहे. तसेच उद्या प्रजासत्ताक दिन (republic day) आहे. त्यानिमित्त बाजार समितीस सुटी राहील असे कृषी उत्पन्न बाजार समितीतून सांगण्यात आले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan : गणपती विसर्जनाला गेलेले तीन तरुण बुडाले, एकाचा मृतदेह सापडला तर दोघे बेपत्ता

गँगवॉर पेटलं! राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या खूनाचा बदला; आरोपीच्या मुलालाच संपवलं, पुण्यात थरार

मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुकीला गालबोट; विजेच्या शॉक लागून तरूणाचा मृत्यू, ४ गंभीर जखमी, रात्री नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्रात दाखल

Reviver Upay: रविवारी हे उपाय बदलतील तुमचं आयुष्य; सर्व समस्यांपासून मिळेल मुक्तता

SCROLL FOR NEXT