Solapur News Saam tv
ऍग्रो वन

Fengal Cyclone : फेंगल चक्रीवादळाची भीती; सोलापुर बाजार समितीत कांद्याची आवक वाढली, दर घसरले

Solapur News : दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये फेंगल चक्रीवादळ धडकले आहे. हे चक्रीवादळ हळूहळू पुढे सरकत असून वादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे.

विश्वभुषण लिमये

सोलापूर : दक्षिण भारतात फेंगल चक्रीवादळाने हाहाकार माजविला आहे. या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील जाणवत आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाली असल्याने पावसाची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी कांद्याची काढणी करत विक्रीसाठी मार्केटमध्ये नेत आहे. यामुळे सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढली आहे. 

दक्षिण भारतातील तामिळनाडूमध्ये फेंगल चक्रीवादळ धडकले आहे. हे चक्रीवादळ हळूहळू पुढे सरकत असून वादळामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस होत आहे. दरम्यान महाराष्ट्रात देखील चक्रीवादळाचा परिणाम जाणवत असून मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. तर काही भागात पाऊस देखील पडला आहे. परिणामी शेती पिकांचे नुकसान होत आहे. याच भीतीने कांदा उत्पादक शेतकरी सावध झाला आहे. 

८५० ट्रक कांद्याची आवक 

फेंगल चक्रीवादळामुळे पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या भीतीने अनेक शेतकरी कांदा काढणी करत लागलीच मार्केटमध्ये विक्रीसाठी आणत आहेत. यामुळे सोलापुरात कांद्याची आवक वाढली आहे. सोलापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील दोन दिवसात जवळपास ८५० ट्रक कांद्याची आवक झाली असून कांद्याची आवक जास्त आणि कच्चा कांदा असल्याने बाजारात कांद्याचे दर घसरले आहेत. सर्वसाधारण कांद्याला प्रतिक्विंटल दोन ते तीन हजार रुपये भाव मिळत आहे. 

वाशिममध्ये सोयाबीनची २२ हजार क्विंटलची आवक
वाशीम
: वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसली तरी आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांत काल २२ हजार क्विंटलची आवक झाली. त्यात सर्वाधिक ८ हजार क्विंटलची आवक वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली होती. सोयाबीनला अपेक्षित भाव मिळत नसला तरी शेतकरी आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अल्पभूधारक शेतकरी आपले सोयाबीन विकत असल्याने वाशिमच्या बाजार समितीत आवक वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑर्डर ऑफ द रिपब्लिकने सन्मानित

Badlapur Firing : बदलापूर गोळीबार प्रकरणाला नवं वळण; गाळीबारामागे शिवसेना पदाधिकाऱ्याचा हात?

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

SCROLL FOR NEXT