Onion Price Saam tv
ऍग्रो वन

Onion Price: दहा पोती कांदा अन्‌ २ रूपयांचा चेक; शेतकऱ्याच्या कांद्याला कवडी मोलाचा भाव

दहा पोती कांदा अन्‌ २ रूपयांचा चेक; शेतकऱ्याच्या कांद्याला कवडी मोलाचा भाव

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर : राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी राजा मेटाकोटीला आला. यात भर म्हणून शेतकऱ्यांच्या (Farmer) शेतीमालाला कवडी मोलाचा दर देऊन प्रशासनानेही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. (Solapur) सोलापुरातल्या एका शेतकऱ्याला चक्क दोन रुपयांचा चेक देऊ त्याची घोर चेष्टा केल्याचे प्रकरण समोर आले आहे. (Maharashtra News)

यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याचे चित्र आहे. गतवर्षीच्या तुलनेत सोयाबीन, कापूस, तूर, कांदा इत्यादी शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याचं चित्र आहे. शेतकऱ्यांनी बाजारात चांगला दर मिळेल या आशेवर सोयाबीन, कापूस तूर, कांदा घरीच साठवून ठेवला आहे. कांद्याच्या (Onion) दरात देखील मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये यामुळं संतापाची लाट पसरली आहे.

दोन रूपयांचा चेक दिला

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी राजेंद्र चव्हाण हे दिवसभर काबाडकष्ट करून आपल्या शेतीत सोनं पिकवण्याच स्वप्न धरून ते प्रामाणिकपणे गेले अनेक वर्ष शेती करतात. यंदा त्यांनी आपल्या शेतात कांद्याचे पीक घेतले. कांदा पिकला, तयार झालेल्या कांद्याला योग्य भाव मिळेल म्हणून हा कांदा बाजार समितीत आणला. बाजार समितीने राजेंद्र चव्हाण यांच्या हातात चक्क दोन रुपयांचा चेक दिल्याने राजेंद्र चव्हाण यांच्या तोंडच पाणी पळाले. दहा पोती कांदा आणि मोबदल्यात केवळ दोन रुपये. हा चेक बघून राजेंद्र चव्हाण यांच्या डोळ्यात पाणी धरलं आणि ते निराशही झाले.

सरकारला धडा शिकवू

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने दोन रुपयाचा चेक शेतकऱ्याला देऊन त्याची घोर थट्टा केल्याची प्रतिक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. सरकार जर शेतकऱ्यांसंदर्भात अशी भूमिका घेत असेल तर 2024 ला या सरकारला धडा शिकवेल; असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: वैशाली नागवडे यांची राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी निवड

Ladki Bahin Yojana : चुकीचा लाभ घेणार्‍या लाडक्या बहि‍णींवर सरकारची कारवाई, तुरुंगवासाची शक्यता, वाचा नेमकं कारण

गावरान पद्धतीची झणझणीत कोहळ्याची भाजी; एकदा खाल तर बोटं चाटत राहाल

Cancer treatment: शक्तीवर्धक गोळ्यामुळे कॅन्सरवर मात करता येणार, संशोधनात मोठं यश

Arun Govil Fees: १९८७ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारे 'श्रीराम'! २०२६ च्या 'रामायण'साठी अरुण गोविल यांनी किती फी घेतली?

SCROLL FOR NEXT