buldhana saam tv
ऍग्रो वन

Buldhana News : बुलढाण्यात कृषी विभागाची मोठी कारवाई, एक कोटी पंचवीस लाखांचे बियाणे गोडाऊन सिल

तालुका कृषी अधिकाऱ्यांनी खामगाव येथे एक कृषी केंद्र सिल केले.

संजय जाधव

Buldhana News : बुलढाण्यात कृषी विभागाने मोठी कारवाई केली आहे. अवैधरित्या साठवून ठेवलेल एक कोटी पंचवीस लाखांच बियाणे गोडाऊन सिल केले आहे. या प्रकरणी चिखली शहर पोलिसांत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. (Maharashtra News)

बुलढाणा कृषी विभागाने सायंकाळी चिखली औद्योगिक क्षेत्रात असलेल्या एका गोडाऊनवर छापा टाकत विक्री साठी तयार करून ठेवलेल्या 2994 बॅग, दोन इलेक्ट्रॉनिक काटे, स्पायरल सेप्रेटर, सीलिंग मशीन असा एक कोटी एकवीस लाख रुपयांचा मुद्देमाल गोडाऊन सह सिल केला.

यामध्ये औरंगाबाद येथील ग्रीन गोल्ड सिड्स कंपनीचे पायाभूत बियाणे असे लिहिलेल्या पिशव्या आढळून आल्या. त्यानंतर कृषी विभागाने दिलेल्या तक्रारीवरून चिखली शहर पोलिस स्थानकात (भादवी 420 , 463 नुसार) चार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान खामगाव (khamgoan) शहरातील अंकुर कृषी केंद्र चालकाने एका शेतकऱ्याला सोयाबीन बियाण्याच्या एका बॅग वर 3600 रुपये किंमत असताना शेतकऱ्याकडून तब्बल 4200 रुपये घेतले अशी तक्रार हाेऊ लागली.

ही तक्रार समजताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ कृषी केंद्र गाठत कृषी केंद्र चालकास चांगलच धारेवर धरले. तसेच तालुका कृषी अधिकाऱ्यास पाचारण करून कृषी केंद्र सिल करण्याची करण्यास भाग पाडले.

यामुळे मात्र शेतकऱ्यांची बियाणे व खते खरेदीत लूट होत असल्याचं समोर आलंय. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी हे कृषी केंद्र सिल करून आज सुनावणी ठेवली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ghabadkund: रहस्य-थराराचा 'घबाडकुंड'; कुशल बद्रिके घेऊन येतोय मराठीतला पहिला 'सस्पेन्स युनिव्हर्स'

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये काम करण्याची संधी; या पदांसाठी भरती जाहीर; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा...

सावधान! बुलढाण्यात २४ तासांत ७ महिला बेपत्ता; अडीच महिन्यातील आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Skin Care : ग्लोइंग चेहरा हवाय? मग हा फेसपॅक नक्की लावा, त्वचा होईल चमकदार

SCROLL FOR NEXT