Lumpy Disease Saam tv
ऍग्रो वन

Lumpy Disease: बेडगेत लम्पीचे थैमान..मृत जनावरांच्या संख्येत वाढ

बेडगेत लम्पीचे थैमान..मृत जनावरांच्या संख्येत वाढ

विजय पाटील

सांगली : मिरज तालुक्यातील बेडग येथे लम्पी आजाराचे थैमान वाढले आहे. अनेक जनावरे बाधीत असून जनावरांच्या (Sangli) मृत संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शासकीय लसी व उपचाराअभावी संसर्गात वाढ होत असून बेडगच्या राज्यक्षेत्रीय पशू वैद्यकिय दवाखाना श्रेणी -२ मधील पशूधन पर्यवेक्षक यांच्या हलगर्जीपणामुळे (Lumpy Disease) लम्पी बाधीत जनावरांचा मृत्यू होत असून उपचारांची नोंदी नाही; अशी तीव्र नाराजी पशू पालकांच्यातून होत आहे. (Tajya Batmya)

बेडगेमध्ये दोन दिवसामधील विजय जाधव यांची गाय, पांडूरंग वाळेकर यांचा बैल, सिद्धू पाटील यांचा बैल, नायकू माळी यांचे देशी खोंड लम्पी आजाराने बळी गेले. शासकीय पशूधन पर्यवेक्षकाच्या हलगर्जीपणा व दिरंगाईने आणखी पशूधनांचा बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही; असे पशूपालकांनी (Farmer) मत बोलून दाखवले आहे.

तालुका पशूधन विकास अधिकारी यांचा बेडगमधील पशूधन पर्यवेक्षकांवर अंकुश नसल्याने पशूधन पर्यवेक्षक व खाजगी पशू वैद्यकिय यांचा समन्वयाचा अभाव बेडगमधील बैठकीत दिसून आला. पण याचा परिणाम म्हणून बेडगेतील लम्पी आजाराचे थैमान वाढतच चालले आहे. या सर्व प्रकारातून लम्पीसारख्या संसर्गजन्य आजारावर मात करण्यासाठी कायम स्वरूपी व अनुभवी पशुवैद्यकीय डॉक्टरांची बेडगमध्ये नेमणूक व्हावी, अशी शेतकर्‍यांची मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

केजरीवालांच्या आपमध्ये फूट, राघव चड्डांसह 3 खासदारांचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करणार

Mithila Palkar: परी म्हणू की सुंदरा...; मिथिला पालकरचा हटके स्वॅग

SCROLL FOR NEXT