Pomegranate Price Saam tv
ऍग्रो वन

Pomegranate Price : टंचाईमुळे डाळिंबाच्या दरात वाढ; प्रतिकिलो दीडशे रुपये मिळतोय भाव

Sangli News : सांगली जिल्ह्यात आटपाडी आणि कवठेमंकाळ तालुक्यात डाळिंबाचे मोठे क्षेत्र आहे. या तिन्ही तालुक्यात टेंभु आणि म्हैसाळ सिंचन योजनांचे पाणी उपलब्ध असल्यामुळे आणि आगाव डाळिंबाला चांगला दर मिळतो.

विजय पाटील

सांगली : जूनच्या डाळिंबाचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. अशातच डाळींबाचा भावाने मोठी उसळी घेतली आहे. सध्या डाळिंबाला प्रति किलो दीडशे रुपयांच्या वर भाव मिळत आहे. जुलै आणि ऑगस्टमधील मोजक्या भागांना एक महिना अवकाश आहे. त्यामुळे डाळिंबाचे भाव असेच चढे राहतील. डाळींबाला चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

सांगली जिल्ह्यात आटपाडी आणि कवठेमंकाळ तालुक्यात डाळिंबाचे मोठे क्षेत्र आहे. या तिन्ही तालुक्यात टेंभु आणि म्हैसाळ सिंचन योजनांचे पाणी उपलब्ध असल्यामुळे आणि आगाव डाळिंबाला चांगला दर मिळतो. शेतकऱ्यांनी आणि उन्हाळ्यात एप्रिल, मे आणि जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मृग बहार धरला होता. तर उर्वरित शेतकऱ्यांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये भार धरला आहे. यानंतर डाळिंब काढण्यास सुरवात झाली होती.   

मागणी वाढल्याने दर वधारले 

बागेतील डाळिंबाची दीड महिन्यापासून विक्री सुरू झाले आहे. सुरुवातीला दीडशे रुपयावर दर होता. मात्र तो जास्त काळ टिकला नाही. तर हा दर मी होत ८० रुपयांवर खाली आला होता. मात्र गेल्या आठवड्यापासून डाळिंबाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यात मार्गशीर्ष महिना चालू झाल्यामुळे राज्याभर पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक अशा मोठ्या शहरात डाळिंबाची मागणी वाढली आहे. त्यामुळे दहा दिवसापासून दरात वाढ होत चालले आहे. ८० रुपयावरून शंभर सव्वाशे ते दीडशे रुपये दर पोहोचले आहेत.

भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव
सांगलीच्या वारणा पट्ट्यात वातावरणाच्या बदलामुळे भाजीपाला पिकावर रोगांचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. तर यावर्षी परतीच्या पावसाने शेतीचे तसेच भाजीपाल्यांचे नुकसान झाले आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पाऊस झाल्यानंतर कडाक्याची थंडी वाढली. त्यामुळे भाजीपाला आणि ऊस शेतीवर रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.

ड्रोन द्वारे पिकावर फवारणी

भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढल्याने शेतकरी उपाय योजना करण्यास लागला आहे. आज वारणा परिसरात शेतकरी वर्ग आधुनिक शेतीच्या तंत्रज्ञानाची सांगड घालत ड्रोन द्वारे पिकावर फवारणी करत आहे. बदलत्या हवामानाला तोंड देत आपली शेती वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पाणीप्रश्नावरून पंचायत समिती कार्यालयात गोंधळ; उपसरपंचांच्या डोक्यावर महिलेने फेकला रिकामा हंडा

GenZ Fashion : 'कमी कपडे, जास्त लुक्स!' काय आहे Gen Z चा कैप्सूल वॉर्डरोब ट्रेंड?

Maharashtra News Live Update: गडचिरोलीत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा; अनेक पंपांवर ‘No Petrol, No Diesel’चे फलक

Crime News: महाराष्ट्र हादरला!२ मित्रांनी केला घात, लॉजवर नेऊन इंजिनिअरिंगच्या विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य; मारहाण करत...

Navratri Vastu Tips: नवरात्रीत घरातील 'या' ७ गोष्टी चुकूनही रिकाम्या ठेवू नका; जाणून घ्या वास्तुशास्त्रातील मान्यता

SCROLL FOR NEXT