Sangli News Saam tv
ऍग्रो वन

Onion Price : रस्त्यावर कांदा फेकत शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग; व्यापाऱ्यांनी दर पाडल्याने शेतकरी आक्रमक

Sangli News : शेतकऱ्यांनी कांदा मार्केटमध्ये आणल्यानंतर बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी प्रती क्विंटल अडीच ते पाच हजार रुपये इतकं दर खाली पाडला आहे.

विजय पाटील

सांगली : खरिपात लागवड करण्यात आलेला कांदा काढणीला सुरवात झाली आहे. हा कांदा विक्रीसाठी मार्केटमध्ये नेला जात असून व्यापाऱ्यांनी मात्र कांद्याचे दर कमी केले आहेत. यामुळे सांगलीतील विष्णू अण्णा फळ मार्केटमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा संताप आज पाहायला मिळाला. 

शेतकऱ्यांनी (Farmer) कांदा मार्केटमध्ये आणल्यानंतर बाजार समिती मधील व्यापाऱ्यांनी प्रती क्विंटल अडीच ते पाच हजार रुपये इतकं दर खाली पाडला आहे. वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याने आज शेतकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी सांगली ते कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग रोखला. यावेळी विक्रीसाठी आणलेला (Onion) कांदा महामार्गावर फेकला व तब्बल एक तास महामार्गावरील वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरल्याने वाहतूक ठप्प झाली होती. बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी धाव घेत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली. यावेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. 

व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट 

गेल्या काही दिवसांपासून सांगलीतील बाजार समितीमध्ये जाणूनबुजून व्यापाऱ्यांकडून कांद्याचे दर पाडले जात आहेत. इतर जिल्ह्यात दर चांगले मिळत असताना सांगली जिल्ह्यात मात्र व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घेतले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live: वंचित बहुजन आघाडीकडून भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Lose Belly Fat : महागड्या डाएटशिवायही पोटावरील चरबी झपाट्याने होईल कमी, फक्त आठवडाभर करा 'हा' घरगुती उपाय

Abhijit Dipke Exclusive: भर मुलाखतीत अभिजीत दिपकेला अश्रू अनावर, मोदी सरकारच्या कोणत्या गोष्टीमुळे डोळ्यात आलं पाणी?

Rain Alert : भीमा-नीरा खोऱ्यात मुसळधार पाऊस; उजनी, वीर धरणांतून मोठा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

EPFO Update : PF धारकांसाठी मोठी खुशखबर! आता पीएफचे पैसे अवघ्या 2 दिवसांत खात्यात, UPI द्वारेही मिळणार रक्कम

SCROLL FOR NEXT