Sangli Crime
Sangli Crime विजय पाटील
ऍग्रो वन

सांगलीतील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची 31 लाखाची फसवणूक

विजय पाटील

सांगली: सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील खुजगाव आणि सिद्धेवाडी येथील १० शेतकर्‍यांची (farmers) तब्बल ३१ लाख ४८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४ दलालांवर तासगाव पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महेश सुभाष पाटील खुजगाव येथील शेतकऱ्याने फिर्याद दिली आहे.

हे देखील पाहा-

रामा चौगुले, परमेश्‍वर चौगुले, अमित चव्हाण, अमोल पाटील कवठेमहांकाळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. संशयित दलालांनी फिर्यादी महेश याची गेल्या हंगामात द्राक्ष (grape) खरेदी केली होती. मात्र, द्राक्ष नेल्यापासून हे दलाल पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होते. गेल्या काही दिवसांपासून या दलालांनी संपर्कच तोडला होता. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश यांनी तासगाव पोलिसात (Police) फिर्याद दाखल केली आहे.

याच दलालांनी सन २०२० मध्ये सिद्धेवाडी येथील राजेंद्र पवार, अरविद दुबोले, पंडित पवार, शामराव चव्हाण, प्रकाश पवार, गुंडा चव्हाण, दिनकर चव्हाण व संतोष जाधव यांची द्राक्षे खरेदी केली होती. या शेतकर्‍यांंचेही पैसे दिलेले नाहीत. त्यांचीही फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरवर्षी द्राक्ष दलालांकडून द्राक्ष उत्पादकांना लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजार समित्या आणि द्राक्ष बागायतदार संघाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Weather Update: मुंबई ठाण्यासह रायगडला पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेचा इशारा!

Raj Thackeray: रत्नागिरीत उद्धव ठाकरेंची तोफ धडाडल्यानंतर आता राणेंसाठी राज ठाकरे मैदानात!

Shantigiri Maharaj यांना शिंदे गटाकडून उमेदवारी?

Team India Squad: टी-२० वर्ल्डकपसाठी दिग्गज खेळाडूकडून टीम इंडियाची घोषणा; या स्टार खेळाडूंना दाखवला बाहेरचा रस्ता

Honeymoon Destination : उन्हाळ्यात पार्टनरसोबत फिरण्यासाठी ही ठिकाणे आहेत बेस्ट!

SCROLL FOR NEXT